सिद्धेगव्हाण ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:24+5:302021-02-24T04:10:24+5:30

शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता. खेड) ग्रामपंचायतीला आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात ...

Smart Village Award to Siddhegwan Gram Panchayat | सिद्धेगव्हाण ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार

सिद्धेगव्हाण ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार

Next

शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता. खेड) ग्रामपंचायतीला आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गावच्या विकासासाठी दहा लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सिद्धेगव्हाणचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे सोपविण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, खेडचे गटविकास अधिकारी अजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव, रस्ते आदी उपक्रम राबविले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सरपंच साधना चौधरी, ग्रामसेविका छाया साकोरे व सारिका वाडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला.

फोटो ओळ : सिद्धेगव्हाण (ता. खेड) ग्रामपंचायतीला 'स्मार्ट ग्राम पुरस्कार' देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे. (छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Smart Village Award to Siddhegwan Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.