सोसायट्यांमध्ये ‘लय भारी गेम शो’ची धूम
By admin | Published: October 10, 2016 02:35 AM2016-10-10T02:35:23+5:302016-10-10T02:35:23+5:30
‘लय भारी गेम शो’मध्ये सहभागी होत सखी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करून धमाल आणताहेत. शहरातील सोसायट्यांमध्ये या गेम
पिंपरी : ‘लय भारी गेम शो’मध्ये सहभागी होत सखी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करून धमाल आणताहेत. शहरातील सोसायट्यांमध्ये या गेम शोची धूम सध्या पाहायला मिळत आहे.
लोकमत सखी मंच, कात्रज दूध यांच्या वतीने व नक्षत्र सिल्क अॅन्ड सारीज यांच्या सहकार्याने महिलांसाठी ठिकठिकाणी आज ‘लय भारी गेम शो’ आयोजित करण्यात येत आहे. आनंदाचे पर्व घेऊन येणारा नवरात्रोत्सव, विविध मनोरंजक स्पर्धा, जिंकण्याची चढाओढ, उत्साही नागरिकांचा जल्लोष, हास्यविनोद करणारे सूत्रसंचालक, बक्षिसांची रेलचेल, संगीतमय वातावरण यांनी परिपूर्ण असलेला हा गेम शो फुलेनगर व कृष्णानगर येथे घेण्यात आला.
गणपती बाप्पा मोरया, दुर्गामाता की जय व माता माता की जय म्हणत स्त्री शक्तीला अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिलांच्या अप्रतिम उखाण्यांनी कार्यक्रमात रंग भरण्यास सुरुवात झाली.
महिलांसाठी तळ्यात मळ्यात, नंबर खेळ, रस्सीखेच, बॉल बकेटमध्ये आदी मनोरंजक स्पर्धा घेण्यात
आल्या. जोडींसाठी केसात स्ट्रॉ माळणे, फुगा फोडणे व पत्नीसाठी विटांचा रस्ता तयार करणे आदी स्पर्धांही घेण्यात आल्या.
स्पर्धांमधून महिलांची खिलाडूवृत्ती दिसून आली. सासू-सुनेच्या जोड्यांच्या रॅम्पवॉकने उपस्थितांचे मन जिंकून घेतले. कार्यक्रमादरम्यान नक्षत्र सिल्क अॅन्ड सारीज व मॅक्स वस्त्रदालन यांच्यामार्फत महिलांना कुपन देण्यात आले.
प्रज्ञा फडके, अनघा बंडगे, मेघा उमककार व साक्षी म्हस्के या चांदीचे नाण्याच्या विजेत्या ठरल्या. रिटा सानप व वर्षा सानप यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)