दोन गटांमध्ये धुमश्चक्री

By Admin | Published: April 10, 2017 03:00 AM2017-04-10T03:00:32+5:302017-04-10T03:00:32+5:30

लोहियानगर येथे दोन गटांमध्ये पूर्वीच्या भांडणांवरून जोरदार हाणामारी झाली. कोयता, बॅट,

Smoke in two groups | दोन गटांमध्ये धुमश्चक्री

दोन गटांमध्ये धुमश्चक्री

googlenewsNext

पुणे : लोहियानगर येथे दोन गटांमध्ये पूर्वीच्या भांडणांवरून जोरदार हाणामारी झाली. कोयता, बॅट, गावठी कट्ट्याने मारहाण झाल्याने दोन्ही गटांतील काहीजण जखमी झाले. याप्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट झाली. पोलिसांनी त्यातील काहींना अटक केली.
शुक्रवारी सायंकाळी ६च्या सुमारास हा प्रकार झाला. आकाश कोळी (वय १९, एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ) याला शिवराय चौकात अडवून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले. बांबूने त्याला मारहाण करण्यात आली. ही भांडणे सोडविण्यासाठी गणेश हलवाई, रितेश महापात्रा, राहुल मिसाळ हे गेले असता त्यांनाही कोयत्याने वार करून बॅट आणि बांबूने मारण्यात आले. यात तिघांच्या डोक्यावर कोयत्यामुळे जखमा झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणात आकाश कोळी याच्या फिर्यादीवरुन १६ वर्षांच्या मुलासह अतुल प्रभाकर नाडे, त्याचा भाऊ शतुल, लखन भोलेनाथ मिसाळ, निखिल विश्वास थोरात व अन्य २ ते ३ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. एकूण ८ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांचा त्यात समावेश आहे. तीन जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

या हाणामारीनंतर अर्ध्या तासाने त्याच चौकात बसलेल्या निखिल थोरात (वय २०, लोहियानगर), लखन मिसाळ, अतुल नाडे, शतुल नाडे, करण पवार यांना वेगासेंटर येथे पूर्वी झालेल्या भांडणांवरून गणेश अशोक हलवाई (वय १८), रितेश उर्फ छोटू महापात्रा (२१), राहुल विष्णू मिसाळ (१८), आकाश किसन कोळी (१९ सर्व जण राहणार लोहियानगर) यांनी बांबूने मारहाण केली.
४रितेश याने गावठी कट्टा निखिल थोरात याच्यावर रोखून त्याला ठार करण्याची धमकी दिली. या सर्वांना अटक करण्यात आली असून, अपूर्व उर्फ मोन्या संजय खंडागळे, तौहित काझी, रोहित सोनवणे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Smoke in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.