कोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:44 PM2018-06-25T14:44:59+5:302018-06-25T21:24:48+5:30

पुढील दोन दिवस कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़.

Smoky rain in Mumbai with Konkan | कोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस

कोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस

Next
ठळक मुद्देसध्या कोकण, सौराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा

पुणे : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सोमवारी ओडिशाच्या आणखी काही भागात, पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात तर बिहार व झारखंडच्या काही भागात झाली आहे़. अरबी समुद्रातील शाखा स्थिर आहे़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़. पुढील चार दिवस कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़.  देवगड २७०, डहाणु, मुंबई (सांताक्रुझ) २३०, तलासरी, ठाणे २१० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ बेलापूर (ठाणे), वसई १७०, कल्याण, पनवेल, पेण १६०, अलिबाग, भिवंडी, माथेरान, विक्रमगड १५०, पालघर १४०, भिरा, जव्हार, उल्हासनगर १३०, अंबरनाथ, गुहागर, म्हसळा, रोहा, शहापूर, उरण ११०, मडगाव, वाडा १००, कर्जत, खेड ९०, रत्नागिरी, सुधागड, पाली ८०,  चिपळूण, कणकवली, खालापूर, मंडणगड, माणगाव ७०, मुरुड, राजापूर, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ६०, हर्णे, कुडाळ, लांजा, मोखेडा, मुरबाड, पेनॅम, पोलादपूर, फोंडा ५० मिमी पाऊस झाला़ तसेच बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला़. 
मध्य महाराष्ट्रात लोणावळा (कृषी), ओझरखेडा ८०, चंदगड, इगतपुरी ७०, महाबळेश्वर, पेठ ५०, गगनबावडा, पौड मुळशी, त्र्यंबकेश्वर ४० मिमी पाऊस पडला़. 
विदर्भात आष्टी, बुलढाणा, चिखलदरा, खामगांव, खारंघा १० मिमी पाऊस झाला़ घाटमाथ्यावरील दावडी २२०, डुंगरवाडी, शिरगाव १५०, ताम्हिणी, भिरा १३०, अम्बोणे १२०, लोणावळा (टाटा) ८०, खोपोली, कोयना (नवजा), लोणावळा (आॅफिस) ७० तसेच विहार ३०, तुलसी २५०, तानसा ८०, वैतरणा ९०, अप्पर वैतरणा ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़. 
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे २़५, लोहगाव २, कोल्हापूर २१, महाबळेश्वर ११४, मालेगाव ६, नाशिक ९, सातारा १९, मुंबई (कुलाबा) ४३, सांताक्रूझ ४८, अलिबाग १४, रत्नागिरी २९, पणजी १४, डहाणु १४३, औरंगाबाद ७, बुलढाणा १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. 
येत्या २४ तासात गुजरात, सौराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. कोकण, गोवा, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, ओडिशा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़. 
२६ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २७ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़ २८ जूनला कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 

Web Title: Smoky rain in Mumbai with Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.