मुस्लिम दफन भूमीमध्ये उभारले स्मृतिवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:37+5:302021-08-20T04:14:37+5:30

केडगाव : येथील मुस्लिम दफनभूमीमध्ये एक मित्र, एक वृक्ष व जामा मस्जिद केडगाव विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Smritivan erected in the Muslim burial ground | मुस्लिम दफन भूमीमध्ये उभारले स्मृतिवन

मुस्लिम दफन भूमीमध्ये उभारले स्मृतिवन

googlenewsNext

केडगाव : येथील मुस्लिम दफनभूमीमध्ये एक मित्र, एक वृक्ष व जामा मस्जिद केडगाव विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २०० झाडांचे वृक्षारोपण करत दिवंगत व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृती वन साकारण्यात आले. पहिल्या टप्प्यातील वड, पिंपळ, कडुलिंब, बहावा, ताम्हण, बकुळ, बेल, आपटा नांद्रुक, पिंपरण, जांभूळ फणस, चिंच या प्रकारची झाडे लावण्यात आली.

या उपक्रमासाठी स्व. भारती वसंत दिवाकर व सुदर्शन चौधरी यांनी स्व. जयप्रकाश चौधरी यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी १०० वृक्ष लावली. या उपक्रमात झाडांच्या संगोपन व संवर्धनासाठी ठिबकची सोय करण्यात आली. त्यासाठी जावेद तांबोळी, डॉ. राजेंद्र दाते व मुबारक आतार यांनी ठिबक पाईप दिले. केडगाव जामा मस्जिद विश्वस्त संस्थेने पीव्हीसी पाईप दिले. यावेळी जामा मस्जिदचे अध्यक्ष शमशुद शेख, सचिव हाजी लियाकत शेख, पूना पीपल बँकेचे शाखाधिकारी अतुल दिवाकर, इरफान तांबोळी, निजाम शेख, डॉ. संदीप देशमुख, लहू धायगुडे, महादेव पंडित, राजेश लकडे, ओंकार होळकर उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना एक मित्र-एक वृक्ष संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुथा म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा झाला. ऑक्सिजनअभावी भरपूर लोकांचा मृत्यू झाला आणि झाडांपासून फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनचे महत्व समजले. पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही म्हणून एक मित्र-एक वृक्ष ग्रुपने केडगाव मध्ये स्मृतिवन ही एक संकल्पना मांडली. या उपक्रमात आपल्या आईवडील, आजी, आजोबा, भाऊ, बहीण यांच्या स्मृती वृक्षांच्या रूपात ठेवण्यासाठी स्मृतिवनची उभारणी केली आहे.

१९ केडगाव

वृक्षारोपणप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर.

190821\1647-img-20210819-wa0025.jpg

केडगाव येथील स्मृती बनामध्ये वृक्षारोपण करताना एक मित्र वृक्ष संघटनेचे कार्यकर्ते

Web Title: Smritivan erected in the Muslim burial ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.