शंभर नाही तर अधिकच्या पन्नास जणांनाही एसएमएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:18+5:302021-01-25T04:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य सेवकांनी पाठ फिरवली असून, यामुळे आत्तापर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य सेवकांनी पाठ फिरवली असून, यामुळे आत्तापर्यंत सरासरी उद्दिष्ठाच्या ५० टक्केही लसीकरण होऊ शकलेले नाही़ यामुळे आता प्रत्येक केंद्रावर महापालिकेने शंभर जणांसह अन्य ५० जणांनाही एसएमएस पाठवून लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर बोलविले आहे़ तसेच केवळ एसएमएस वरच न थांबता प्रत्यक्ष नाव नोंदणी केलेल्या संबंधित आरोग्य सेवकाला महापालिका यंत्रणाकडून फोनही केले जात आहेत़
पुणे महापालिकेकडे पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना देण्याकरिता ४३ हजार लस आलेल्या आहेत़ दोन टप्प्यात असलेल्या देण्यात येणाºया या डोसनुसार साधारणत: २१ ते २२ हजार आरोग्य सेवकांनाच पहिल्या प्राप्त लसीमध्ये लस मिळणार आहे़ परंतु, सध्यस्थितीला आठवडा उलटला तरी लसीकरणासाठी आरोग्य सेवकही लागलीच पुढे येत नसल्याने, आणखी किती काळ लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी लागेल याचा अंदाज नाही़ त्यातच महापालिकेकडे खाजगी आरोग्य संस्थांमधील ४५ हजार २६५ जणांनी तर सरकारी संस्थांमधील ११ हजार ५७९ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती़ पण सद्यस्थितील नोंदणी केलेल्या या आरोग्य सेवकांपैकी अनेकांनीच पाठ फिरवली आहे़
--------------------------------------------------
चौकट :-
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारोजी रोजी ६७ टक्के लसीकरण झाले होते़ या पार्श्वभूमीवर आता शहरातील आठही केंद्रांवर १०० जणांसह अन्य ५० जणांनाही लसीकरणासाठी बोलविण्यात येत आहे़ तसेच लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या संबंधित आरोग्य सेवकाला फोनही केले जात आहेत़
----------------------------------------