अंमली पदार्थ तस्करी करणारी टोळी पुण्यात जेरबंद; हेरॉईन-चरससह साडेबारा लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:23 PM2018-01-13T13:23:42+5:302018-01-13T13:27:04+5:30

सतत ठावठिकाणा बदलत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अंमली पदार्थांच्या ७ तस्करांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एकूण १०२ ग्रॅम हेरॉईन आणि दोन किलो ५० ग्रॅम चरससह १२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. 

smuggler arrested by Pune police; lakhs of money seized with heroin-charas | अंमली पदार्थ तस्करी करणारी टोळी पुण्यात जेरबंद; हेरॉईन-चरससह साडेबारा लाखांचा ऐवज जप्त

अंमली पदार्थ तस्करी करणारी टोळी पुण्यात जेरबंद; हेरॉईन-चरससह साडेबारा लाखांचा ऐवज जप्त

Next
ठळक मुद्देपोलिसांनी सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात, सर्व आरोपी सराईत गुन्हेगारमुख्य आरोपी आरती मिसाळने अंमलीपदार्थ व्यावसायातून अनेक ठिकाणी विकत घेतल्या सदनिका

पुणे : सतत ठावठिकाणा बदलत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अंमली पदार्थांच्या ७ तस्करांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एकूण १०२ ग्रॅम हेरॉईन आणि दोन किलो ५० ग्रॅम चरससह १२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. 
आरती महादेव मिसाळ (रा. लोहियानगर), पुजा महादेव मिसाळ (रा. इनामके चाळ, लोहियानगर), निलोफर हयात शेख (रा. हरकारनगर), रॉकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (रा. रामटेकडी हडपसर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कारसह रोख रक्कम, मोबाईल फोन, ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज हस्तगत करण्यात आला. 
पोलीस तपासात त्यांच्याकडे हेरॉईन (ब्राऊन शुगर) आणि चरसचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून शंभर ग्रॅम हेरॉईन व २ किलो ५० ग्रॅम चरसचा साठा हस्तगत केला. असे ६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. 
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे आणि त्यांच्या पथकाने १५ डिसेंबर रोजी घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीतून छापा मारला होता. त्यात संशयीत आरोपी गोपीनाथ नवनाथ मिसाळ (वय २२, इनामके मळा लोहियानगर), हुसैन पापा शेख (वय २८, रा. सय्यद अली चाळ, सांताक्रूझ, मुंबई) यांना पकडले होते. त्यांच्याकडून ६७ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले होते. 
या प्रकरणातील मुख्य आोरपी आरती मिसाळ व त्यांचे साथीदार पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते. खडक पोलिसांना एका गुन्ह्याचा तपास करीत असताना या टोळीतील संशयीत अजहर उर्फ चुहा हयात शेख (रा. हरकारनगर) याला १८ डिसेंबरला ताब्यात घेतले. 
या प्रकरणातील मुख्य आरोपी आरती मिसाळ ही काळ्या रंगाच्या मोटारीतून नगररस्ता वाघोली परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सागर केकान व विशाल शिंदे यांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. 

अंमली पदार्थातून खरेदी केल्या सदनिका
मुख्य आरोपी आरती मिसाळ हिने अंमलीपदार्थाच्या व्यावसायातून अनेक ठिकाणी सदनिका विकत घेतल्या असून, अनेक वाहने देखील खरेदी  केली आहे. आरोपींच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेली रक्कम आणि सोने देखील या व्यावसायातून खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: smuggler arrested by Pune police; lakhs of money seized with heroin-charas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे