उपम्यात परदेशी चलन लपवून तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:13 AM2017-08-09T04:13:48+5:302017-08-09T04:13:48+5:30
गरमागरम उपम्यात परदेशी चलन लपवून परदेशी चलनाची तस्करी करणाºया २ प्रवाशांना लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गरमागरम उपम्यात परदेशी चलन लपवून परदेशी चलनाची तस्करी करणाºया २ प्रवाशांना लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. हे दोघे प्रवासी दुबईला जात असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
या दोघांकडून एकूण १ कोटी ३० लाख ७१ किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे आयुक्त एम. बी. एस. चौधरी यांनी सांगितली.
निशांत विजय येतम (नागठाणे, रायगड) हर्षा रंगलानी राजू (चेंबूर, मुंबई) अशी त्यांची नावे असून त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रविवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली. अधिकाºयांना त्यांच्याविषयी संशय आला.
या दोघांच्या सामानाची तपासणी केली असता दोघांच्याही बॅगेत उपमा असल्याचे आढळले.
मात्र उपमा ठेवलेल्या पिशवीचे
वजन पाहता अधिकाºयांना संशय आला, त्यामुळे त्यांनी उपम्याचा
डबा पूर्ण उघडून पाहिली असता त्याच्यात १ लाख ७२ हजारांचे अमेरिकन डॉलर्स आणि ३० हजार
युरो सापडले.
या दोन्ही प्रवाशांचा आणि घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याची तपासणी अधिकारी सध्या करत आहेत.