सर्पदंश, सापांच्या पूजेबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:23 AM2017-07-27T06:23:14+5:302017-07-27T06:23:18+5:30

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या युवकांनी सर्पदंश, उपचार, सापांची पूजा आदी विषयांवर जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

snake, nagpanchmi, news | सर्पदंश, सापांच्या पूजेबाबत जनजागृती

सर्पदंश, सापांच्या पूजेबाबत जनजागृती

Next

बारामती : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या युवकांनी सर्पदंश, उपचार, सापांची पूजा आदी विषयांवर जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ५ हजार माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात या मािहतीपत्रकांचे वितरण करण्यात येणार आहे.
सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार मिळणे आवश्यक आहे. साप विषारी, बिनविषारी ओळखता येत नसल्यास त्याला शोधून पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न करूनये. १0 ते २0 सेकंदाहून अधिक वेळ लागणार असल्यास, सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यास सुरुवात करावी. सर्पदंश झालेल्या व्यक्तीसमोर आरडाओरडा करू नये. त्यामुळे त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडण्याचा धोका असतो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला हालचाल करू देऊ नये.
सर्पदंशानंतर आवळपट्टी करण्यासाठी कोणत्याही कपड्याचा, रुमालाचा वापर करावा. सर्पदंश झालेली जागा जंतुनाशकाने स्वच्छ करावी. जखम कापण्याची माहिती नसल्यास कापू नये, ते घातक ठरू शकते. नाग किंवा मण्यार चावल्यास आवळपट्टी वापरावी.
इतर विषारी सर्पदंश झाला असल्यास आवळपट्टी वापरू नये, सर्पदंश हाताला झाल्यास आवळपट्टीने आवळून दंडाला बांधावे. दंड व दोरीमध्ये पेन किंवा पेनाच्या जाडीची काठी अथवा बोट टाकून बांधावे. त्यानंतर घातलेली वस्तू बाहेर काढावी.
दवाखान्यात नेताना दर
दहा मिनिटांनी गाठ १० ते २० सेकंदासाठी सैल करावी, असे
आवाहन नेचर फें्रड्स आॅर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सर्पदंशाचे विष मंत्रोपचार, झाडपाला, धार्मिक विधीने
उतरत नाही. त्यामुळे अशा अंधश्रद्धामध्ये वेळ घालवू नये, याबाबत ठळकपणे जनजागृती करण्यात येणार आहे.

...नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्र नजर ठेवणार
नागपंचमी दिवशी काही जण नाग घेऊन दारोदारी फिरतात. दूध, लाह्याला पैसे मागतात. नागाची पूजा केली जाते. हा प्रकार चुकीचा आहे.
यामध्ये अनेकदा
सापांचा मृत्यू होतो. यंदा त्यासाठी शहर आणि परिसरात ४० सर्पमित्र नजर ठेवणार आहेत.
नागाला आणून गैरप्रकार करणाºयाला तातडीने पकडून वनविभागाच्या मार्फत पोलिसांच्या ताब्यात
देणार आहे.

Web Title: snake, nagpanchmi, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.