मागासवर्ग आयोगाच्या कथित समाजशास्त्रज्ञाचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:37+5:302021-09-18T04:11:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाचे समाजशास्त्रज्ञ डॉ. बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...

The so-called sociologist of the Backward Classes Commission opened the brass | मागासवर्ग आयोगाच्या कथित समाजशास्त्रज्ञाचे पितळ उघडे

मागासवर्ग आयोगाच्या कथित समाजशास्त्रज्ञाचे पितळ उघडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाचे समाजशास्त्रज्ञ डॉ. बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आयोगाच्या स्थापनेतील फोलपणा समोर आला आहे. तायवाडे हे आयोगावरील समाजशास्त्रज्ञ पदासाठी पात्रच नव्हते, यासंबंधीचा लेखी आक्षेप आम्ही नोंदवला आहे. त्यामुळे त्यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

डॉ. तायवाडे यांनी आपला निर्णय नागपूरमधून जाहीर करत असताना, ओबीसींना राजकीय आरक्षण देऊ शकत नसल्याने राजीनामा देणार असल्याची सांगितले आहे. वस्तुतः त्यांना पात्रतेच्या अभावामुळे हे पद आज ना उद्या सोडावेच लागले असते, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. ढोणे यांनी मागील आठवड्यात पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य मागासवर्ग आयोगावरील सदस्यांच्या नेमणुकीत गडबड घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

-----

२ ऑक्टोबरचे उपोषण होणार

डॉ. तायवाडे यांनी राजीनामा द्यावा किंवा न द्यावा, पण सदस्यांचा व्हेरीफाईड डेटा जाहीर झाला पाहिजे, अपात्र सदस्यांना वगळले पाहिजे, नवीन पात्र सदस्यांना संधी दिली पाहिजे, अशी भूमिका घेऊन २ ऑक्टोबरपासून पुण्यातील आयोगाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत आणखी काही अपात्र सदस्यांचे खरे रूप उघड होईल, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

Web Title: The so-called sociologist of the Backward Classes Commission opened the brass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.