...म्हणून सगळ्यांनी केले त्यांच्या माेबाईलचे फ्लॅश अाॅन !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 08:32 PM2018-09-24T20:32:18+5:302018-09-24T20:41:31+5:30
पुणेकरांनी अनाेख्या पद्धतीने गणरायाला अभिवादन केले.
पुणे : साेहळा कुठलाही असाे अापल्या माेबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रत्येकाची धावपळ चाललेली असते. पुण्यातील विसर्जन मिरवणूकीत तर प्रत्येकजण अापल्या माेबाईलमध्ये अापल्याला हवा ताे क्षण टिपत हाेता. माेबाईल अाणि माणूस यांच इतकं घट्ट नातं निर्माण झालंय की अाता भक्तीतही या माेबाईने जागा मिळवली अाहे. पुण्यातील विसर्जन मिरवणूकीत अापला लाडका बाप्पा अलका चाैकात येताच प्रत्येकजण अापल्या माेबाईलची फ्लॅश अाॅन करुन अनाेख्या पद्धतीने अभिवादन करत हाेते.
प्रत्येक क्षणांचा साेबती म्हणून अाता माेबाईल अाेळखला जाऊ लागला अाहे. कार्यक्रम, क्षण कुठलाही असाे माेबाईलमध्ये ताे टिपणे अाता एक परंपरा झाली अाहे. भेटल्यावर एकमेकांची विचारपूस करण्याएेवजी अाता सेल्फीला प्राधान्य दिलं जातं. विसर्जन मिरवणूक तर हाैशी छायाचित्रकारांसाठी पर्वणीच असते. मिरवणूक किती वेगळ्या पद्धतीने अापल्या माेबाईलमध्ये साठवता येईल याचा अताेनात प्रयत्न त्यांचा असताे. अाता तर स्वतःच लाईव्ह जाण्याची साेय सुद्धा असल्याने अापल्या मित्रपरिवाला अापण घेत असलेल्या अानंदाची अनुभूती दिली जात अाहे. विसर्जन मिरवणूकीत अनेकजण अापल्या माेबाईलवर लाईव्ह जाऊन पुण्याबाहेरच्या मित्र-मैत्रिणींना बाप्प्यांचे दर्शन घडवत हाेते. त्यातच पुणे महापालिकाही मागे राहिली नाही.
अलका चाैकात दगडूशेठ गणपती, अखिल मंडई गणपती येताच पालिकेतर्फे उभारण्यात अालेल्या स्वागत कक्षातून माेबाईलची फ्लॅश अाॅन करुन बाप्पाला अभिवादन करण्यास सांगण्यात अाले. लगेचच सर्वांनी फ्लॅश अाॅन करुन बाप्पाला अनाेखे अभिवादन केले. त्याचबराेबर भारताने पाकिस्तानवर क्रिकेटमध्ये विजय मिळवताच पुन्हा एकदा फ्लॅश अाॅन करुन जल्लाेष करण्यात अाला.