बारामतीत आतापर्यंत ३१ हजार नागरिकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:43+5:302021-04-02T04:10:43+5:30

३३ केंद्रांवर केले जाते लसीकरण; नागरिकांचाही प्रतिसाद तालुक्यात ३३ केंद्रे: नागरिकांचाही मिळाला प्रतिसाद बारामती: शहर आणि तालुक्यात लसीकरणाला ...

So far 31,000 people have been vaccinated in Baramati | बारामतीत आतापर्यंत ३१ हजार नागरिकांना लसीकरण

बारामतीत आतापर्यंत ३१ हजार नागरिकांना लसीकरण

Next

३३ केंद्रांवर केले जाते

लसीकरण; नागरिकांचाही प्रतिसाद

तालुक्यात ३३ केंद्रे: नागरिकांचाही मिळाला प्रतिसाद

बारामती: शहर आणि तालुक्यात लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बारामतीत कोणत्याही अडथळ्याविना लसीकरण सुरू आहे. पूर्वीचे १५ केंद्र आणि पुन्हा नव्याने १८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नव्याने लसीकरण सुरू केले आहे. बारामती शहरात मार्च अखेर १२ हजार ८०६ तर तालुक्यात १८ हजार ८३४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. असे शहर व तालुक्यात मिळून ३१ हजार ६४० नागरिकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.

बारामती तालुक्यातील ३३ केंद्रांवर शासनाच्या नियमावलीनुसार खासगी रुग्णालयात को-विन अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर लस दिली जाते. सरकारी रुग्णालयात वॉक-इन किंवा आॅन-साइट नोंदणी करून लस देण्यात येते. प्रथम ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटांतील इतर आजार असलेल्यांना लस दिली जात असे. तर ४५ ते ५९ वर्षं वयोगटातील कोमॉर्बिड रुग्णांना विना अट लसीकरण करण्यात येत आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. बारामती तालुक्यात (दि.१) रोजी एक हजार ४६४ लसीकरण करण्यात आले असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.

-----------------

लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.

-डॉ. सदानंद काळे

वैद्यकीय अधीक्षक, बारामती उपजिल्हा रूग्णालय

-------------------

कोमॉर्बिड रुग्णांनी लसीकरणांचा लाभ घ्यावा, बारामती तालुक्यात १८ नवीन केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

- डॉ. मनोज खोमणे

तालुका वैद्यकीय अधिकारी

------------------------

फोटो ओळी : बारामती येथील महिला रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

०१०४२०२१-बारामती-१३

०१०४२०२१-बारामती-१४

Web Title: So far 31,000 people have been vaccinated in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.