Vasant More:...म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला', वसंत मोरेंनी सांगितलं पक्ष प्रवेशाचं नेमकं कारण

By राजू इनामदार | Published: July 4, 2024 04:00 PM2024-07-04T16:00:51+5:302024-07-04T16:01:41+5:30

Vasant More- उद्धव ठाकरे यांनी ज्या धडाडीने राजकीय संकटातही शिवसेनेला नेतृत्व दिले आहे, त्याने मी प्रभावीत झालो

So I joined Shiv Sena Uddhav balasaheb Thackeray group Vasant More said the reason for joining the party | Vasant More:...म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला', वसंत मोरेंनी सांगितलं पक्ष प्रवेशाचं नेमकं कारण

Vasant More:...म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला', वसंत मोरेंनी सांगितलं पक्ष प्रवेशाचं नेमकं कारण

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर वंचित विकास आघाडीत प्रवेश केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आता शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश करत आहेत. मोरे यांच्या कात्रजमधील राजकारणाची सुरूवातच शिवसेनेतून झाली होती. कात्रजचे ते शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख होते. 

मुंबईत गुरूवारी दुपारी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मोरे यांनी सांगितले कि उद्धव ठाकरे यांनी चांगला निर्णय घेतला अशा शब्दात स्वागत केले. कात्रज, हडपसर या भागातील विविध प्रश्नांविषयी त्यांना सांगितले. पुणे शहरातील समस्यांविषयीही चर्चा झाली. ९ जूलैला मुंबईतच मातोश्रीवर शिवसनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. आपले सर्व कार्यकर्तेही शिवसनेत येत आहेत. स्वग्रुही परतल्याचा आनंद आहे असे ते म्हणाले.

फायरब्रँड अशी ओळख असलेल्या मोरे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबरोबरच शिवसेना सोडली होती. त्यानंतर ते मनसेकडून २ वेळा कात्रज परिसरातून महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले. ते गटनेते होते. शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. समाजमाध्यमांवरील त्यांच्या लोकप्रियतेमधून मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यांबरोबर त्यांचे वाद झाले.

खुद्द राज यांनीही त्यांना समाजमाध्यमाचा वापर जपून करावा अशी सुचना केली होती.  लोकसभा निवडणूक लढवायची नाही या स्थानिक पदाधिकार्याच्या शिफारशीवरून त्यांनी मनसे सोडली. वंचित विकास पक्षात प्रवेश करून त्यांनी पुणे शहर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. अपेक्षित मतदान झाले नसल्याने ते अस्वस्थ होते. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.आपण कोणत्याही स्वार्थाने प्रवेश केलेला नाही असे ते म्हणत असले तरी हडपसर किंवा खडकवासला विधानसभा मतदार संघातून विधानसभा लढवण्याचा त्यांचा विचार असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेत प्रवेश करण्यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नाही. माझ्या भागातील प्रश्न सुटावेत यासाठी मला शिवसेना हा योग्य पक्ष वाटला म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या धडाडीने राजकीय संकटातही शिवसेनेला नेतृत्व दिले आहे, त्याने मी प्रभावीत आहे. - वसंत मोरे- माजी नगरसेवक.

Web Title: So I joined Shiv Sena Uddhav balasaheb Thackeray group Vasant More said the reason for joining the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.