...म्हणून महायुतीने पुण्यात मेट्रो आणली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 01:22 PM2024-09-29T13:22:52+5:302024-09-29T13:23:09+5:30
सगळ्यांनी ठरवलं की मोदींना हटवायचे पण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, मोदींचा प्रभाव वाढतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतय
पुणे : पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याचे ट्राफिक खूप वाढले आहे. ट्राफिक कमी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. ट्राफिकमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन प्रदूषण वाढतय ते कमी करण्यासाठी महायुतीने पुण्यात मेट्रो आणल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहुन अधिक खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्घाटन गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी होणार होता. मोदी जी संवेदनशील मनाचे आहेत. पण जेव्हा सकाळी चर्चा केली पण पुणेकरांना त्रास होऊ नये या गोष्टी पंतप्रधान यांनी लक्षात घेल्या. संवेदनशील पंतप्रधान कसा असतो हे त्यांनी दाखवलं. उद्घाटन केलं असतं तर म्हणले असते लोकांना त्रास देऊन केलं इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं. विरोधक बदलापूर मध्ये आरोपीला फाशी द्या फाशी द्या म्हणले. आरोपी फायर करतो तेव्हा पोलीस शोपिस धरणार का? ते केलं नसतं तर म्हणणार बंदूक शोपीस साठी आहे का? इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, दोन्ही बाजूने बोलणाऱ्याना काय म्हणतात? अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
विरोधक लाडक्या बहिण योजनेत खोडा घालतात. पण माझ्या बहिणी त्यांना जोडे दाखवतील. लाडक्या बहिणींनो तुम्ही निश्चिन्त राहा. ही योजना कायम सुरु राहणार आहे. निवडणूक डोळ्यसमोर ठेवून आम्ही ही योजना केलेली नाही असंही त्यांनी सांगितले आहे.
मोदींचा प्रभाव वाढतोय
जो बायडन आणि मोदी यांचा स्नेह आपण पहिला आहे. विश्वात मोदींना जे प्रेम मिळतंय ते आपला अभिमान आहे. काही लोकं विदेशात जाऊन देशाची बदनामी करतायत सगळ्यांनी ठरवलं की मोदींना हटवायचे पण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मोदींचा प्रभाव वाढतोय, विरोधकांच्या पोटात दुखत आहे. असा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला आहे.