...म्हणून स्लीपर आणि शॉर्ट पॅन्ट घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 08:30 PM2018-07-12T20:30:14+5:302018-07-12T20:31:18+5:30

शॉर्ट पॅन्ट आणि पायात स्लीपर घातल्या आहेत असे सांगत रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे.त्याविरोधात त्याच रेस्टोरंटमध्ये  स्लीपर आणि शॉर्ट पॅन्ट घालून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले. 

... so the movement of the NCP with the addition of sleeper and short pants | ...म्हणून स्लीपर आणि शॉर्ट पॅन्ट घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

...म्हणून स्लीपर आणि शॉर्ट पॅन्ट घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

Next

पुणे : शॉर्ट पॅन्ट आणि पायात स्लीपर घातल्या आहेत असे सांगत रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे.त्याविरोधात त्याच रेस्टोरंटमध्ये  स्लीपर आणि शॉर्ट पॅन्ट घालून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले. 

        सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक रेस्टोरंटमध्ये काही तरुणांना तुमचा अपिअरन्स हा आमच्या हॉटेलमधील सेवा देण्यास योग्य नाही सांगत प्रवेश नाकारला होता. याबाबत चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत घडलेली घटना अशी की, शहरातील आयसीसी टॉवरच्या बी विंगमध्ये संबंधित रेस्टोरंट आहे. त्याठिकाणी काल रात्री असीम त्रिभुवन, विराज मुनोत, डॉ अजित वाडेकर, संजय होस्मानी, डॉ प्रदीप शालिनी, विलास कोंढाळकर यांनी रात्री ११.३० वाजता प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यातील  काहींनी शॉर्ट पॅन्ट आणि स्लीपर घातली होती. या मुद्द्यावरून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. हॉटेलचे संचालक अझर यांच्याशी संवाद त्यांनी लॉबीतील नियम दाखवून त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला.त्यानंतर या तरुणांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. पोलीस आल्यावरही रेस्टोरंट प्रशासनाची भूमिका कायम होती.

        या घटनेचा निषेध करत युवक अध्यक्ष राकेश कामठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे शहरातील इतर कुठल्याही हॉटेलमध्ये जर अशाप्रकारचे नियम लागू असतील तर त्याही  हॉटेलमध्ये अशाप्रकारे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यापुढे एजंट जॅक हॉटेलमध्ये सर्वांना प्रवेश देणार असल्याचे हॉटेल प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आल्याचे कामठे यांनी सांगितले. 

Web Title: ... so the movement of the NCP with the addition of sleeper and short pants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.