...तर कोणत्याच गावांना टँकरची आवश्यकता भासणार नाही : पृथ्वीराज लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:50+5:302021-07-17T04:08:50+5:30
सुपे :पावसाचा थेंब अन् थेंब तसेच सांडपाणी आहे, त्याच जागी जिरवण्याचा प्रयत्न केल्यास उन्हाळ्यात कोणत्याच गावांना पाण्याच्या टँकरची ...
सुपे :पावसाचा थेंब अन् थेंब तसेच सांडपाणी आहे, त्याच जागी जिरवण्याचा प्रयत्न केल्यास उन्हाळ्यात कोणत्याच गावांना पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासणार नाही, असे प्रतिपादन बारामती तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक पृथ्वीराज लाड यांनी केले.
सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित महाविद्यालयाचा सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून लाड बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि निसर्ग स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या ६ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुपे येथील पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी बारामती तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक पृथ्वीराज लाड, निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष विलास वाघचौरे, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी वैभव भापकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील, आदींसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि सुपे इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक, बारामती ब्लड बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी हनुमंत चांदगुडे, शरद मचाले, अतुल ढम, नीलेश पानसरे, अमोल जगताप, रवींद्र पानसरे आदींचे सहकार्य मिळाले. प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक प्रा. अमर नांदगुडे यांनी केले.
.............................................
फोटो ओळी : सुपे येथील महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना लाड व इतर मान्यवर.
१६०७२०२१-बारामती-०३
————————————————