...म्हणून, या निजामाच्या अवलादी इथं वळवळ करायला लागल्या; राज यांनी शिवसेनेवरच फोडलं खापर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 02:59 PM2022-05-22T14:59:06+5:302022-05-22T15:00:53+5:30
Raj Thackeray In Pune : या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत. यांचा (शिवसेनेचा) तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला.
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ, मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आज पुण्यातही धडाडली. यावेळी राज यांनी शिवसेनेसह विरोधकांवर तुफान हल्ला चढवला. "यांच्या राजकारणात. या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत," असे म्हणत, राज ठाकरे यांनी एमआयएमच्या वाढत्या प्रभावाचे खापर शिवसेनेवर फोडले आहे. ते पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहात बोलत होते.
राज म्हणाले, यांच्या-यांच्या राजकारणासाठी आणि हिंदू-मुस्लीम मतांच्या धृविकरणासाठी, त्या एमआयएमला मोठे केले. एमआयएम संभाजीनगरमध्ये हिंदूंच्या विरोधात सातत्याने बोलत राहिली पाहिजे, म्हणजे यांची रोजी-रोटी चालू राहील. यांच्या लक्षात आले नाही, की आपण एक राक्षस वाढवतोय आणि म्हणता म्हणता तिकडे एमआयएमचा खासदार झाला. यांच्या राजकारणात. या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत. यांचा (शिवसेनेचा) तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला.
आमच्याच देशात आणि आमच्याच महाराष्ट्रात ही एमआयएमची आवलाद येते आणि जो आमच्या शिव छत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला, त्या औरंगजेबाच्या कबरीवर येऊन डोकं टेकवतात आणि आम्हाला लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही आम्हाला, कारण सत्ताधारीच असेल बसलेले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असले, तर यापलिकडे काय बोलायचं? सुफी संतं? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला.
अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणेत. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता म्हणे. मग काय मधे शिवाजी महाराज आले. तुमच्या सोईसाठी कशाला इतिहास बदलताय? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी केला.
हेही वाचा -
'यांचं' राजकारण एकदा मोडीतच काढा! औरंगाबादच्या नामांतरासह राज यांच्या PM मोदींकडे 3 मोठ्या मागण्या
उद्धव ठाकरे तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा सवाल