...तर त्यांनी तातडीने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी; रोहित पवारांचा मनसेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:27 PM2022-05-24T17:27:14+5:302022-05-24T17:39:48+5:30
आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीचं कारण सांगितले. त्यानंतर राजकीय चर्चाना चांगलंच उधाण आले आहे. विरोधी मनसेवर पक्षांकडून टीकेला सुरुवात झाली आहे. त्यावरच मनसे नेते सचिन मोरे यांनी ट्विटच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला होता. "कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है." असे ते अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मनसेवर टीका केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला आहे. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी असं टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये. राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा.... तर पवार साहेब हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.
सचिन मोरे यांनी ट्विटच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला होता
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray@BalaNandgaonkar@abpmajhatv@lokmat@mataonline@zee24taasnews@SandeepDadarMNS@ABPNewspic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022