...तर कोरोनाचा धोका टळू शकतो : वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:32+5:302021-05-16T04:09:32+5:30
उरुळी कांचन येथे विविध संस्थांच्या वतीने आयोजित रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटनानंतर कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या ...
उरुळी कांचन येथे विविध संस्थांच्या वतीने आयोजित रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटनानंतर कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन व सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांचे हस्ते झाले. दरम्यान, २२८ जणांनी रक्तदान केले. तर १८ जणांनी प्लाझ्मादानसाठी रक्त नमुना ब्लड बँकेकडे पाठविले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता कांचन, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन, प्राचार्य बबनराव दिवेकर, सपोनि नितीन शिंदे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, सुनील जगताप, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, अजिंक्य कांचन, जयदीप जाधव, अमोल भोसले, संतोष चौधरी, किरण वांझे, शैलेश गायकवाड उपस्थित होते.
राजू बडेकर या युवकाने सलगचे १०१ वे रक्तदान केले. त्यामुहे त्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, उरुळी कांचन ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन, हवेली तालुका पत्रकार संघ, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, उरुळी कांचन पोलीस चौकी, महात्मा गांधी सर्वोदय संघ आणि आधार ब्लड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते.
१५ उरुळी कांचन
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर.