... त्यामुळे आम्ही वीज बिल भरणार नाही : रघुनाथदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:31 PM2021-03-22T17:31:27+5:302021-03-22T17:32:38+5:30

बारामती परिमंडलातील शेतकऱ्यांना दुप्पट, तिप्पट खोटी वीज बिले देण्यात आली आहेत.

... So we will not pay the electricity bill: Raghunathdada Patil | ... त्यामुळे आम्ही वीज बिल भरणार नाही : रघुनाथदादा पाटील

... त्यामुळे आम्ही वीज बिल भरणार नाही : रघुनाथदादा पाटील

googlenewsNext

बारामतीबारामती परिमंडलातील शेतकऱ्यांना दुप्पट, तिप्पट खोटी वीज बिले देण्यात आली आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही बारामतीच्या उर्जा भवनवर आलो आहोत. राज्य शासनाने शेतकऱ्यांना १६ तास वीज देणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात ८ तास शेतकऱ्यांना वीज मिळते. व वीज बिल मात्र १६ तासांचे मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचेच ८ तासांचे पैसे महावितरणकडे राहतात. त्यामुळे आम्ही वीज बिल भरणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मांडली.

बारामती येथील उर्जाभवन परिसरात शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.२२) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना रघुनाथदादा पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

पाटील म्हणाले, अनेक शेतकऱ्यांना महावितरणच्या वतीने खोटी व वाढवून वीज बिले दिली आहेत. तसेच सक्तीने वसुली केली जात आहे. वीज बिल भरले नाही तर वीजजोड तोडण्यात येत आहेत. एकीकडे शेतकरी आसमानी संकटाशी मुकाबला करून उभे राहू पाहत असताना सुलतानी संकटामुळे मात्र आता तो पुरता खचू लागला आहे. बारामती येथील महावितरणचे कार्यालय हे चार ते पाच जिल्ह्यांचे प्रमुख कार्यालय आहे. म्हणून येथे आंदोलन करत आहे. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. 

यावेळी वर्षा काळे, शिवाजीराव नांदखिले,पांडुरंग रायते,
अशोक खलाटे, रामभाऊ साखडे, बाळासाहेब घाटगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------

Web Title: ... So we will not pay the electricity bill: Raghunathdada Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.