इंग्रजकालीन घड्याळाऐवजी मिळाले साबण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:15 PM2019-04-14T23:15:18+5:302019-04-14T23:15:33+5:30

ऑनलाइन वस्तू मागविल्यावर त्या वस्तूऐवजी पार्सलमधून साबण मिळाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.

soap got instead of British clock | इंग्रजकालीन घड्याळाऐवजी मिळाले साबण

इंग्रजकालीन घड्याळाऐवजी मिळाले साबण

Next

पुणे : ऑनलाइन वस्तू मागविल्यावर त्या वस्तूऐवजी पार्सलमधून साबण मिळाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. मात्र, इंग्रजकालीन घड्याळाऐवजी साबणाच्या वड्या मिळण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. इंग्रजकालीन घड्याळ देतो असे सांगून त्यांच्याकडून एकाने २ लाख रुपये घेतले. त्यांना एक पार्सल सोपविले. त्यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यात वर्तमानपत्राच्या कागदात कपड्याचे साबण असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी मुंबईतील ३८ वर्षांच्या तरुणाने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार कँटोंमेंट हॉस्पिटलच्या पाठीमागील गेटच्या समोरच्या गल्लीत शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईतील एक तरुण सारसबागेत आला असताना त्याची आरोपीशी ओळख झाली. त्याने आपल्याकडे इंग्रजकालीन घड्याळ असून ते हवे असेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आरोपीला २ लाख रुपये देण्याचे कबूल केले.

आरोपीने त्यांना शनिवारी खडकी कँट्रोंमेंट हॉस्पिटल पाठीमागील गल्लीत बोलावले. त्यानुसार ते तेथे गेले त्याने त्यांच्याकडे एक पार्सल दिले. त्यांनी उघडून पाहिल्यावर त्यात वर्तमानपत्राचे कागद एकत्र करुन त्याचा गोलाकार रोल करुन त्यामध्ये कपड्यांचा साबन टाकून तो पेपरमध्ये गुंडाळून पिशवीत भरुन त्यांना दिला होता. पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली असून खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: soap got instead of British clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.