मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साबणाचा ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 12:42 PM2022-10-15T12:42:22+5:302022-10-15T12:46:07+5:30

साबणाची खोकी द्रुतगती मार्गावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती...

Soap truck accident on Mumbai-Pune Expressway Death of the driver near khopoli | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साबणाचा ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साबणाचा ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

googlenewsNext

पुणे :मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ साबणाचा ट्रक उलटला. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. साबणाची खोकी द्रुतगती मार्गावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

द्रुतगती मार्गावर रात्री पावणेदहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अपघात घडला. मुंबईकडे जाणारा ट्रक खोपोलीजवळ उतारावर उलटला. ट्रकमधील साबणाची खोकी रस्त्यावर पडली. अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच आरआयबीचे पथक, महामार्ग पोलीस, तसेच खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. द्रुतगती मार्गावर पडलेली साबणाची खोकी बाजूला करण्यात आली. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने कोंडी झाली.

Web Title: Soap truck accident on Mumbai-Pune Expressway Death of the driver near khopoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.