महिला अधिकाऱ्यांची समाजोपयोगी संवेदनशीलता

By admin | Published: October 15, 2015 01:11 AM2015-10-15T01:11:00+5:302015-10-15T01:11:00+5:30

महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना

Sociability of women officers | महिला अधिकाऱ्यांची समाजोपयोगी संवेदनशीलता

महिला अधिकाऱ्यांची समाजोपयोगी संवेदनशीलता

Next

पुणे : महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना, एखादा गंभीर प्रसंग निर्माण झाल्यावर महिला अधिकारी कार्यालय अथवा फिल्डवर अधिक सक्षमपणे काम करतात. त्यामुळे महिलांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर कोणत्या पदावर आहे, याला महत्त्व राहत नाही, असे मत महिला शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांनी येथे व्यक्त केले.
नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत बुधवारी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, जीवन प्राधिकरण, कोषागार विभागातील महिला अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील आव्हाने, पुरुष मानसिकतेत होत असलेला बदल, समाजात काम करताना येणाऱ्या अडचणी, अधिकारीपदावर असताना कार्यालय आणि घर या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी कसरत आणि या दोन्ही ठिकाणी स्वत:ला सुपरवुमन म्हणून सिद्ध करण्याची धडपड या विषयांवर सर्वच महिला अधिकाऱ्यांनी मनमोकळेपणे आपली मते मांडली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले.
अनेकदा क्षमता असूनही ‘की’ पोस्टवर डावलले जाणे, बदल्यांमुळे कुटुंबाची हेळसांड याचबरोबर खासगीच्या तुलनेत असलेले सुरक्षित वातावरण, वरिष्ठ अधिकारी व पुरुष कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेला पाठिंबा, समाजाचा बदलता दृष्टिकोन यामुळे शिक्षक व डॉक्टर या चौकटीच्या बाहेर पडून सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक मत महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
स्त्री-पुरुष समानतेपेक्षा समाजाच्या मानसिकतेत बदलाची गरज आहे. कार्यालयामध्ये एक कार्यक्षम व सक्षम अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे अन् दुसरीकडे गृहदक्ष स्त्रीची जबाबदारी देखील निभावताना अनेकदा महिला अधिकाऱ्यांची फरफट होते. एकाच वेळी विविध पातळ्यांवर ‘ती’ लढत असल्याने अनेक वेळा तिची मानसिक व शारीरिक घुसमट होते.
- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
विशाखा समित्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत झाली आहे. कार्यालयामध्ये पुरुष सहकाऱ्याकडून काही त्रास झाल्यावर तक्रार करण्यासाठी कोणताही फोरम नव्हता; पण विशाखा समित्यामुळे आता किमान तक्रार करण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या आहेत. समितीकडे तक्रार आल्यानंतर कारवाई होते हे कळल्यानेच महिलांची छेडछाड कमी झाली आहे.
- उल्का कळसकर,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी (मनपा)

Web Title: Sociability of women officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.