रक्तदानातून कलाकारांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:40+5:302021-01-14T04:10:40+5:30
सोनवणे यांनी ‘आपला कट्टा मराठी अड्डा’ या युट्युब चॅनलवर ‘उसने पुढारी’ ही विनोदी वेबसिरीज सुरू केली आहे. ‘कितिबी हाना ...
सोनवणे यांनी ‘आपला कट्टा मराठी अड्डा’ या युट्युब चॅनलवर ‘उसने पुढारी’ ही विनोदी वेबसिरीज सुरू केली आहे. ‘कितिबी हाना पण नेतेच म्हणा’ अशी टॅगलाईन असलेल्या वेबसिरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ''उसने पुढारी''च्या टीमने ‘रक्तदान शिबिर’ या विषयावर एक एपिसोड बनवला. याचाच एक भाग म्हणून नोबेल हॉस्पिटल यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करून कलाकारांनीही रक्तदान केले. यातून सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे.
वेबसिरीज मध्ये मयूर सोनवणे लेखक व दिग्दर्शक असून गणेश रणदिवे, योगेश्वर चित्ते (अहमदनगर), अमोल जांबुतकर (हिंगोली), प्रदिप जव्हेरी, सुप्रिया बरकडे, भाग्यश्री शिंदे, श्रीकृष्ण भिंगारे, संजय मुंडीक, सुशांत मुंडीक, रवी निर्मळे, वैभव दिक्षीत, स्वप्नील गुडेकर, सुमित राठोड असे अनेक कलाकार भूमिका साकारत आहेत. त्यांनी स्वखर्चाने ही वेबसिरीज सुरू केली आहे.