युवकाने जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:51+5:302021-05-13T04:09:51+5:30
पाटेठाण : सद्य:स्थितीमध्ये ग्रामीण भागात चालू असलेल्या कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाच्या दिवशी होणारा अनाठायी खर्च तसेच हौसमोल ...
पाटेठाण : सद्य:स्थितीमध्ये ग्रामीण भागात चालू असलेल्या कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाच्या दिवशी होणारा अनाठायी खर्च तसेच हौसमोल न करता टाकळी भीमा (ता. दौंड) येथे वीस लिटरप्रमाणे संपूर्ण गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून युवकाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
टाकळी भीमा (ता. दौंड) येथील राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल युनियन लिडर, युवा उद्योजक योगेश मेमाणे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता परिस्थितीचे भान ठेवून कुठल्या प्रकारचा गाजावाजा न करता समाजोपयोगी विधायक उपक्रम राबवला आहे.
या वेळी सरपंच शरद वडघुले, निखिल ठाकर, नवनाथ मेमाणे, विकास मेमाणे, गणेश खुटवड, संतोष गरदरे, सुरेखा वडघुले, अशोक नरसाळे, प्रकाश ठाकर, संतोष कुंभार, अमित वडघुले, काशीनाथ गरदरे, सोन्या जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मिरवडी (ता. दौंड) येथे वाढदिवसाच्या निमित्ताने आठ दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला.