समाजमन बदलण्याची ताकद सनदी सेवेत : चंद्रकांत दळवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 07:11 PM2018-05-11T19:11:19+5:302018-05-11T19:12:25+5:30

आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा.

social mind change strength in government service : chandrakant dalvi | समाजमन बदलण्याची ताकद सनदी सेवेत : चंद्रकांत दळवी 

समाजमन बदलण्याची ताकद सनदी सेवेत : चंद्रकांत दळवी 

Next
ठळक मुद्देविचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो.

पुणे : तळागाळातील विशेष घटकांचा विकास व्हावा याकरिता मोठ्या प्रमाणावर दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे. दुस-या बाजूला भवतालची सामाजिक परिस्थिती बदलण्याची ताकद ही सनदी सेवेत आहे, असे मत निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. महात्मा फुले वसतिगृह या संस्थेतर्फे निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचा सत्कार ज्येष्ठ विधीज्ञ अँड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. सुरेश गुजराथी, अ‍ॅड. संदिप गुजराथी यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीकृष्ण पाषाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या पवन साळुंखे आणि मैथली कोरडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. 
दळवी म्हणाले की, उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळावा याकरिता समाजातील दातृत्वान व्यक्तींनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच समाजातील जी परिस्थिती बदलता येत नाही ते बदलण्याची ताकद सनदी सेवेच्या माध्यमातून मिळते. त्याचा नवोदित अधिका-यांनी सदुपयोग क रावा. प्रशासकीय सेवांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे मोठे दालन खुले होत असते. आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा. आव्हाड म्हणाले, वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करता येते. वकिली व्यवसाय हा भावनिक आणि व्यवहारिक गुंतागुंत सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु विचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो. ओरडून किंवा मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपले म्हणणे खरे ठरत नसते. त्यामुळे वकिलांनी संयम आणि संयत भुमिका ठेवावी. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण पाषाणकर, सुरेश गुजराथी आणि संदीप गुजराथी, महात्मा फुले वसतिगृहाचे मुख्य विश्वस्त उल्हास ढोले-पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केली. अरुण कुदळे यांनी  प्रास्ताविक केले. दिपक जगताप यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: social mind change strength in government service : chandrakant dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.