कायदा-सुव्यवस्थेसाठी सोशल पोलिसिंग

By admin | Published: December 23, 2016 12:10 AM2016-12-23T00:10:33+5:302016-12-23T00:10:33+5:30

पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाललेल्या घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी

Social policing for law and order | कायदा-सुव्यवस्थेसाठी सोशल पोलिसिंग

कायदा-सुव्यवस्थेसाठी सोशल पोलिसिंग

Next

चाकण : पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाललेल्या घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप निर्माण करून त्यामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रांतील १०० सदस्यांना सामावून घेण्याचे आदेश कोल्हापूर दूरक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने चाकण पोलीस ठाण्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर परिक्षेत्रातून आयजी १००, उपविभागीय पातळीवर स्टार खेड १०० व पोलीस ठाणे पातळीवर पीएस १०० ग्रुप तयार करण्यासाठी विशेष बैठक झाली. या ग्रुपमध्ये खासदार, आमदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, पोलीस पाटील, पत्रकार, नगरसेवक, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, ग्रा.पं. सदस्य, वकील, डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी, कामगार, सामाजिक संस्था आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या वेळी खेड पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांनी या ग्रुपचे महत्त्व पटवून दिले. कायदा-सुव्यवस्था राखणे, माहिती प्रसारण करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, अपघात व घटनांची माहिती, गुन्हेगारी रोखणे आदींसाठी या ग्रुपचा उपयोग होणार आहे. थोडक्यात पोलिसांचे कान, नाक, डोळे म्हणून या ग्रुपने काम करायचे आहे, असे घट्टे यांनी सांगितले. या वेळी उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक श्रीधर जगताप, महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा मंगल देवकर, संध्या जाधव, जि. प. सदस्या सुरेखा ठाकर, पं. स. सदस्य सोमनाथ दौंडकर, माजी सभापती कल्पना पाटील गवारी, सदस्य अमृत शेवकरी, नगरसेवक प्रवीण गोरे, शेखर घोगरे, चाकण फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल, पी.के. फाउंडेशनच्या सचिव नंदाताई खांडेभराड, पत्रकार प्रतिनिधी हनुमंत देवकर, हरिदास कड, अविनाश दुधवडे, सुनील ओव्हाळ, पाटील गवारी, दशरथ काचोळे, उपसरपंच प्रकाश खराबी, दीपक नाणेकर, यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, विद्यार्थिनी उपस्थित होते. या बैठकीत लग्न समारंभातील चोऱ्या रोखण्यासाठी ज्या मंगल कार्यालयांमध्ये मोठी पार्किंग व्यवस्था, सीसी टीव्ही, रखवालदार आदी सुविधा नसल्यास त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, पुणे-नाशिक महामार्गावरील मोई फाट्यावर तोडलेल्या दुभाजकामुळे वळताना मोठे कंटेनर अडकून पडतात व वाहतूककोंडी होते. हे दुभाजक बंद करण्याची मागणी पाटील गवारी यांनी केली. तसेच, महामार्गालगत उभे केलेले कंटेनर चालकांवर व महामार्गावर नव्याने टाकलेले दगडी दुभाजक काढणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Social policing for law and order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.