समाजप्रबोधनानेच समाजाची होते उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 AM2021-02-11T04:12:06+5:302021-02-11T04:12:06+5:30
दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित ३६७ व्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी दादासाहेब सोनवणे होते. जोशी म्हणाले ...
दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित ३६७ व्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी दादासाहेब सोनवणे होते.
जोशी म्हणाले की, बालपणापासून उपक्रममय जीवन संघर्ष करताना कर्मवीर भाऊराव पाटील, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी आणि चित्रपटातील माध्यमातून सामाजिक संदेश देणारे कलाकार राज कपूर यांच्यासारख्या महापुरुषांच्या सहवास योगायोगाने लाभला. जीवन कृतार्थ झाले. अशा थोर विभूतींची जीवनचरित्र म्हणजे वादळातील सागरी दीपस्तंभ होत. दीड दिवस शाळेत गेलेले अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा, चंदनवाडी, माकडीचा माळ आशा एकाहून एक सरस साहित्यकृती निर्माण केल्या. डॉ. आंबेडकरांनी तर संविधानाच्या कृतीने सामान्य माणसाला जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला.