समाज कल्याणची २६० महाविद्यालयांना नोटीस; पाच दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 01:19 AM2020-12-22T01:19:27+5:302020-12-22T01:21:42+5:30

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते.

Social welfare notices to 260 colleges; Order to disclose within five days | समाज कल्याणची २६० महाविद्यालयांना नोटीस; पाच दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

समाज कल्याणची २६० महाविद्यालयांना नोटीस; पाच दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

पुणे: महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाविद्यालयांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु काही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी आवश्यक माहिती घेवून सामाजिक न्याय विभागाला वेळेत देत नाहीत.तसेच माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे अशा पुणे शहर व जिल्ह्यातील 260 महाविद्यालयांना सामाजिक न्याय विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. मात्र,विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असणे, बँक खात्यास आधार कार्ड संलग्नित न करणे, बँक निष्क्रीय असणे आदी त्रुटीची पूर्तता करून प्रलंबित अर्ज जलद निकाली काढण्याबाबत सामाजिक न्याय विभागाकडून महाविद्यालयांना दोन स्मरणपत्र पाठवण्यात आले.या स्मरणपत्रांना प्रतिसाद न देणाऱ्या 260 महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पाच दिवसात याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी दिले आहेत.
 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्ती अदा करण्यास झालेल्या विलंबास अनेकवेळा महाविद्यालये कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळेच मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास किंवा त्यांना फ्रीशिप रक्कम न मिळाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य जबाबदार राहतील, असे या कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केले आहे. 

Web Title: Social welfare notices to 260 colleges; Order to disclose within five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.