समाजवादी चळवळ मागे पडली
By admin | Published: June 6, 2016 12:22 AM2016-06-06T00:22:36+5:302016-06-06T00:22:36+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात भांडणे खूप आहेत. एकत्रित येत नाही. मात्र आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. समाजवादी विचारांचा प्रभाव ओसरत चालला आहे. अनेक प्रश्नांवर काम करण्यात चळवळ मागे पडली असल्याची खंत परिसंवादात व्यक्त करण्यात आली.
राष्ट्र सेवा दलाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘देशापुढील आव्हाने आणि राष्ट्र सेवा दलाची अपरिहार्यता’ या विषयावर रविवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अॅड. सुरेखा दळवी, कॉम्रेड संजय दाभाडे, आमदार कपिल पाटील, अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. डॉ. अभिजीत वैद्य अध्यक्षस्थानी होते.
अॅड. दळवी म्हणाल्या, ‘अहिंसा, सत्यामध्ये ताकद आहे. पण, समाजवादी विचारांचा प्रभाव पडत नाही. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांपर्यंत आजही आपण पोहचू शकलो नाही. याचे विवेचन करण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थितीने निर्माण झालेल्या धोरणांचे आव्हान आजही आपल्यासमोर आहे. सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले हातपाय पसरत आहे. जातीचे राजकारण वाढत आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतरची अस्वस्थता आजही दिसून येत आहे. देशात विषमता, द्वेष भावना शिल्लक आहे तोपर्यंत राष्ट्र सेवा दलाची गरज आहे.’’
दाभाडे म्हणाले, भांडवलशाहीचे मोठे आव्हान आहे. फॅसिझम आकाराला येऊ लागले आहे. विचार आणि संघटन एकाच गाड्याच्या दोन बाजू आहेत. समाजवादी दिशेने आगेकूच करण्याची जबाबदारी सेवा दलाने घेतली आहे. आर्थिक धोरणांमुळे जी परिस्थिती आलीय त्याला कसे सामोरे जाणार आहोत. आव्हानांचा सामना करत सेवा दल निभावून पुढे जाईल.
पाटील यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कमजोर वीणेवर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना केलेली
नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात
भांडणे खूप आहेत. एकत्रित येत
नाही. आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. (प्रतिनिधी)