‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला सोसायट्यांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:21 PM2019-08-08T12:21:18+5:302019-08-08T12:24:09+5:30

महापालिकेने बांधकामाला मंजुरी देतानाच खासगी इमारतींना  ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले आहे. 

Societies are getting a positive response to 'Rainwater Harvesting' | ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला सोसायट्यांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला सोसायट्यांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

Next
ठळक मुद्देपुणे महापालिका : जलजागृतीसह पालिकेचा ‘जलयुक्त शहर’ उपक्रमस्वयंसेवी संस्थाही करताहेत कामबांधकाम विभागाने गेल्या पाच वर्षांत भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या २१८४ इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे अपेक्षितया कराची सवलत घेणाऱ्या सोसायट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र

पुणे :  राज्यातील सर्व शासकीय व खासगी इमारतींवर ‘रुफ टॉप रेन हार्वेस्टिंग’ करण्याचे आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी २००२ मध्ये दिले होते. महापालिकेने बांधकामाला मंजुरी देतानाच खासगी इमारतींना  ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले आहे. 
दरवर्षी शेकडोने तयार होणाऱ्या इमारतींपैकी किती इमारती हा प्रकल्प शेवटपर्यंत सुरू ठेवतात हा खरा प्रश्न आहे. सर्व मंजुºया आणि परवाने तसेच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हे प्रकल्प सुरू असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून दाखविले जाते. परंतु, पुढील अल्प कालावधीतच हे प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचेही दिसून येते. बांधकाम विभागाने गेल्या पाच वर्षांत भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या २१८४ इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे अपेक्षित होते. यासोबतच पालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागाकडून रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प करणाऱ्या सोसायट्यांना करामध्ये सवलत दिली जाते. 
या कराची सवलत घेणाऱ्या सोसायट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांत करसंकलन विभागाने १२ हजार ७९४ सोसायट्यांना हे प्रकल्प राबविल्यामुळे करामध्ये सवलत दिल्याची आकडेवारी आहे. 
..........

जलयुक्त शहर ही संकल्पना
आगामी काळात लोकसंख्या वाढत जाणार आहे; परंतु पाण्याचे स्रोत तेवढेच राहणार आहेत. पावसाचे पाणी भूगर्भात सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ही जलयुक्त शहर ही संकल्पना राबवित आहोत. सीएसआर आणि अन्य उपक्रमांमधून पाणी भूगर्भात जिरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. - मुक्ता टिळक, महापौर पुणे 
......
रेनवॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज
नवीन बांधकामाच्या ठिकाणी एनओसीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले जाते. परंतु, हे प्रकल्प शास्त्रोक्त नसतात. पालिकेकडे हे प्रकल्प तपासण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळच नाही. त्यामुळे अनेक त्रुटी राहतात. अशा सोसायट्या या विषयात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांना गाठतात. त्यामुळे २००७ मध्ये केलेला कायदा केवळ नावापुरताच राहिला आहे. याविषयी काम करण्याची आवश्यकता आहे.- कर्नल शशिकांत दळवी, क्लायमेट रिएलिटी प्रोजेक्ट इंडिया
........
असे केले जाते जलपुनर्भरण
पावसाच्या पाण्याची साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात, तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी 
........
....
जलपुनर्भरणाचे हे आहेत फायदे
पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. जलसंधारणाच्या बºयाच पद्धती या घर बांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी उपयुक्त. निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.
...........
पालिकेच्या साडेतीनशे इमारतींवर हे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्यात ७५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. 
१० नाट्यगृहे, ७ क्षेत्रीय कार्यालये,  २ व्यापारी संकुल, २८ रुग्णालये, ७ क्रीडागृहे, २१ शाळांचा  समावेश होता.
हजार चौरस फुटांच्या छतावर साधारणपणे ७५ हजार लिटर पावसाचे पाणी पडते. 
मुंबईमध्ये हे प्रमाण ३ लाख लिटर आहे, तर औरंगाबादसारख्या दुष्काळी पट्ट्यातही ८० हजार लिटरएवढे आहे. 
.........
पाच वर्षांतील बांधकाम परवाने आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग
2014-15
बांधकाम परवाने - 495
करात सवलत- 557
........
2015-16
बांधकाम परवाने- 519
करात सवलत- 334
.....
2016-17
बांधकाम परवाने- 315
करात सवलत- 2783
.......
2017-18
बांधकाम परवाने- 378
करात सवलत- 1659
.........
2018-19
बांधकाम परवाने- 477
करात सवलत- 3300

Web Title: Societies are getting a positive response to 'Rainwater Harvesting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.