कोरोना नियम मोडल्याने सोसायटीने दाखल केला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:16+5:302021-05-27T04:11:16+5:30
बाणेर -पाषाण लिंक रोडवरील मिडोज हॅबिटॅट को-ऑप हौ. सोसायटीमध्ये संबंधित सभासद येथे कुटुंबासहित राहत आहे. लॉकडाऊमध्ये सोसायटीमधील एका सभासदाने ...
बाणेर -पाषाण लिंक रोडवरील मिडोज हॅबिटॅट को-ऑप हौ. सोसायटीमध्ये संबंधित सभासद येथे कुटुंबासहित राहत आहे. लॉकडाऊमध्ये सोसायटीमधील एका सभासदाने गैरमार्गाने पुणे महानगरपालिकेचे ओळख पत्र प्राप्त केले.
ही सोसायटी इमारत महानगरपालिकेने कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असूनही हा सदस्य सोसायटीत प्रवेश निषिद्ध असताना दररोज सोसायटी बाहेर ये-जा करीत होता. या व्यक्तीने शासनाने दिलेल्या निर्देशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून ओळखपत्राचा गैरवापर करत सोसायटी रहिवासी त्यांच्या आरोग्यास बाधा पोहोचवत आहे, असे तक्रारी उल्लेख आहे.
सोसायटीचे सचिव गणेश तिखे म्हणाले, सोसायटीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असताना सोसायटीचे व शासनाचे नियमांचे पालन न करता सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याने सोसायटीने हे कारवाईचे पाऊल उचलले. आपल्या या सोसायटीच्या आरोग्याची जबाबदारीदेखील संचालक मंडळाने पार पाडली पाहिजे, हीच यामागची भूमिका आहे.