सोफा फर्निचर मॅन्युफॅक्चर कामगारांना कामावर जाण्यास परवानगीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:34+5:302021-05-26T04:11:34+5:30

पुणे : सोफा फर्निचर मॅन्युफॅक्चर कामगारांना काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे महाराष्ट्र एस. एफ. मॅन्युफॅक्चरर ऑल लेबर ...

Sofa furniture manufacturing workers demand permission to go to work | सोफा फर्निचर मॅन्युफॅक्चर कामगारांना कामावर जाण्यास परवानगीची मागणी

सोफा फर्निचर मॅन्युफॅक्चर कामगारांना कामावर जाण्यास परवानगीची मागणी

Next

पुणे : सोफा फर्निचर मॅन्युफॅक्चर कामगारांना काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे महाराष्ट्र एस. एफ. मॅन्युफॅक्चरर ऑल लेबर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

युनियनचे संस्थापक अध्यक्ष अहमद खान आणि उपाध्यक्ष अब्दुल गनी शेख यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.

याबाबत अहमद खान यांनी सांगितले की, पुणे महाराष्ट्र एस. एफ. मॅन्युफॅक्चर ऑल लेबर युनियनचे पुण्यात २५० ते ३०० सदस्य आहेत. सोफा, फर्निचरचे काम करणारे हे सर्व कामगार गरीब व होतकरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करणे अशक्य झाले आहे. आम्ही आमच्या कामगारांना युनियनचे ओळखपत्र दिले आहे. या कामाकरिता साईट व प्लॉटवर जाण्या-येण्याकरिता परवानगी द्यावी. आमचे कामगार कोविड-१९च्या या आजाराबाबत सर्व काळजी घेऊन नियमांचे पालन करू, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Sofa furniture manufacturing workers demand permission to go to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.