हवेलीच्या सभापतिपदी शीतल गारूडकर बिनविरोध
By admin | Published: April 8, 2016 01:00 AM2016-04-08T01:00:25+5:302016-04-08T01:00:25+5:30
आज-उद्या करता-करता अखेर हवेली पंचायत समितीचे सभापतिपदही बदलले असून, गुरुवारी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मांजरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल गारूडकर यांची बिनविरोध निवड झाली.
पुणे : आज-उद्या करता-करता अखेर हवेली पंचायत समितीचे सभापतिपदही बदलले असून, गुरुवारी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मांजरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल गारूडकर यांची बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतींना गेल्या वेळी पक्षनेते अजित पवार यांनी निवड करताना सव्वा वर्षासाठी ही निवड केल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गेल्या ४ महिन्यांपासून काही पंचायत समित्यांत हे बदल करण्यात आले. यात मुळशी, पुरंदरमध्ये सभापती-उपसभापतींचा बदल केला होता. हवेलीच्या सभापती व उपसभापतींचाही राजीनामा पक्षनेत्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याकडे आला होता. मात्र,
यापैकी फक्त उपसभापतींचा राजीनाम मंजूर झाल्याने यापूर्वी उपसभापतिपदासाठी निवडणूक लागली होती. यात निवडणूक होऊन ६ मतांची आघाडी घेऊन राष्ट्रवादीचे नितीन दांगट यांची उपसभापतिपदी निवड झाली होती.
उपसभापतिपदाचा राजीनामा मंजूर केला; मात्र सभापतिपदाचा राजीनामा मंजूर केला नव्हता. यामुळे सभापतींना अभय मिळाले, अशी चर्चा होती.
आता निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्याने नवीन सभापती झाले, तर त्यांना आठ ते नऊच महिने मिळणार. त्यामुळे बदल होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी सभापतींचाही राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पक्षनेत्यांच्या आदेशानुसार मंजूर केला आणि ९ दिवसांपूर्वी सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम लागला होता.