साॅप्टवेअर इंजिनिअर पतीकडून हुंड्यासाठी पत्नीला मारहाण; इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 06:20 PM2021-03-18T18:20:29+5:302021-03-18T18:22:41+5:30

मार्च २०१८ मध्ये फिर्यांदी यांचा पोंधवडी येथील साॅप्टवेअर इंजिनिअर, जिवन पवार यांच्याशी विवाह झाला.

Software engineer husband beats wife ; Filed a case at Indapur police station | साॅप्टवेअर इंजिनिअर पतीकडून हुंड्यासाठी पत्नीला मारहाण; इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साॅप्टवेअर इंजिनिअर पतीकडून हुंड्यासाठी पत्नीला मारहाण; इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

बाभुळगाव : लग्नात ठरलेल्या हुंड्यांचे एक लाख रूपये व  पुण्यात घर घेण्यासाठी चार ते पाच लाख रूपये माहेरून आणावेत यासाठी साॅप्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीकडुन पत्नीला वारंवार मारहाण, तर सासु, सासरे व दीर यांच्याकडुन मानसिक व शारीरिक त्रास देत छळ केला. हुंड्यांच्या पैशासाठी घरातुन सुनेला कायमचे हाकलुन देणार्‍या पती, सासु, सासरे व दीर यांच्याविरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी प्रियंका जिवन पवार (वय २४) रा. पोंधवडी,ता.इंदापूर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर पती जिवन अगतराव पवार, सासू सुनिता अगतराव पवार ,सासरे अगतराव धोंडीबा पवार व दीर बाळकृृृृष्ण आगतराव पवार (सर्व रा.पोंधवडी भिगवण,ता.इंदापूर,जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१८ मध्ये फिर्यांदी यांचा पोंधवडी येथील साॅप्टवेअर इंजिनिअर, जिवन पवार यांच्याशी विवाह झाला.लग्नात फिर्यादी यांच्या वडिलांनी जावयाला दोन तोळे सोने व एक लाख रूपये हुंडा व सर्व साहित्य व पूर्ण मानपान दिला होता. लग्न झाल्यानंतर दोन महिने संसार सुखात झाला. मात्र, त्यानंतर पत्नीने माहेरून हुंड्याचे राहिलेले पैसे व पुण्यात घर घेण्यासाठी चार ते पाच लाख रूपये आणावेत यासाठी पतीने वारंवार उपाशी ठेवत लाथा बुक्क्यांनी मारहाण करत केली. तर घरातील सासु, सासरे व दीर यांनीही फिर्यादी यांना मानसिक व शारीरिक त्रास देत छळ केला. तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. २७ जुलै २०२० रोजी वरील सर्वांनी फिर्यादी यांच्या भावाला बोलावून घेतले व लग्नामध्ये राहिलेला एक लाख रूपये हुंडा घेऊन ये, तरच तिला नांदवितो असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत घरातुन फिर्यादी यांना हाकलुन दिले. 

त्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे पती,सासु, सासरा, व दीर हे सर्वजण मिळुन फिर्यादी यांचे माहेरी कौठळी येथील घरी आले. त्यावेळी फीर्यादी यांचे आई- वडील कामानिमित्त बारामतीला गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांचे पती जिवन पवार यांनी फिर्यांदीचे वडील हुंड्याचे पैसे कसे देत नाहीत, तेच बघतो असे म्हणत फिर्यादीच्या घरात सर्वासमोर मारहाण केली. 

Web Title: Software engineer husband beats wife ; Filed a case at Indapur police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.