सोमेश्वर कारखान्याचा ऊस लागवड हंगाम जाहीर
By admin | Published: June 1, 2017 01:32 AM2017-06-01T01:32:59+5:302017-06-01T01:32:59+5:30
येथील सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा साखर संस्था यांच्या सल्ल्यानुसार
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमेश्वरनगर : येथील सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा साखर संस्था यांच्या सल्ल्यानुसार सन २०१८-१९ या सालात गाळप होणाऱ्या उसाचा ऊस लागवड हंगाम जाहीर केला आहे.
संचालक मंडळाची मासिक सभा २६ मे रोजी झाली. यामध्ये ठराव क्रमांक ६ नुसार पुढीलप्रमाणे ऊस जातीच्या लागवडींना परवानगी देण्यात आलेली आहे. आडसाली या हंगामात १ जुलै ते १४ आॅगस्ट या दरम्यान ऊस लागवड करायची आहे. यामध्ये को-८६०३२, कोएम ०२६५ व को व्हीएसआय ८००५ या उसाच्या जातींना परवानगी देण्यात आलेली आहे. पूर्व हंगामात १ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत को-८६०३२, कोएम-०२६५, को- व्हीएसआय ९८०५, कोसी ६७१, एमएस१०००१, को-९४०१२, तसेच सुरू या हंगामात १५ डिसेंबर ते २८ फे बु्रवारी या कालावधीत को-८६०३२, कोएम-०२६५, कोसी-६७१, व्हीएसआय ४३४, एमएस-१०००१, को-९४०१२ या उसाच्या जातींना परवानगी देण्यात आलेली आहे. खोडवा या हंगामात २८ फेब्रुवारीअखेर तुुटलेल्या उसाच्या खोडव्यामध्ये को-८६०३२, कोएम- ०२६५, को-व्हीएसआय ९८०५,८००५ कोसी ६७१, एमएस-१०००१, को-९४०१२ उसाचा खोडवा राखण्यासाठी संचालक मंडळाने परवानगी दिलेली आहे. हे करत असताना संचालक मंडळाने काही नियमही घालून दिलेले आहेत. यामध्ये लागण नोंद देते वेळी सातबारा व आठ अ देणे बंधनकारक राहणार आहे. एकाच वेळी जादा उसाची नोंद घेतली जाणार नाही.
प्रतिएकरी १० टनांपेक्षा कमी ऊस असल्यास तो ऊस स्वत: कारखान्यावर तोडून आणावा. सभासदांनी दिलेली उसाची नोंद बोगस आढळल्यास ५०० रुपये ऊस बिलातून वसूल केले जाईल. जिरायती भागात लागण करणाऱ्या शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी व सुरू हंगामात को- ८६०३२, को-व्हीएसआय८००५, कोसी ६७१, एमएस १०००१, को -४०१२ या उसाची लागवड करावी. उसाची नोंद देताना सातबारा देणे आवश्यक आहे. कारखान्याने ठरवून दिलेल्या तारखेपूर्वी उसाची लागण केल्यास, ती लागण तारीख १५ दिवस उशिरा धरण्यात येईल. आदी सूचना परिपत्रकामध्ये करण्यात आलेल्या आहेत.