या मातीतून महाराष्ट्र, हिंदकेसरी पैलवान तयार व्हावेत
By admin | Published: October 12, 2016 02:27 AM2016-10-12T02:27:58+5:302016-10-12T02:27:58+5:30
कुस्ती हा शक्ती, युक्ती आणि शिस्तीचा खेळ असून शिरूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताबाचे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन शिरूर- हवेलीचे
निमोणे : कुस्ती हा शक्ती, युक्ती आणि शिस्तीचा खेळ असून शिरूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताबाचे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन शिरूर- हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले.
करडे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुलांच्या शालेय कुस्ती स्पर्धांच्या समारोप व बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी कुस्तीपटूंचे कौशल्य आणि संयोजन पाहून आपण आॅलिंपिकचे सामने पाहत असल्याचा आनंद होत आहे. या मातीतून महाराष्ट्र व हिंदकेसरी पैलवान तयार व्हावेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.’’
विजेत्या मल्लांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव घावटे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, उपसरपंच गणेश रोडे, माजी सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील, माजी सरपंच संतोष लंघे, प्राचार्य ए. एम. कावरे, माजी प्राचार्य आय. टी. कळमकर, क्रीडाशिक्षक बाळासाहेब भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
१४ वर्षे वयोगट :
आशुतोष रमेश भोंडवे, बळीराम परशुराम गांधले - छत्रपती संभाजी हायस्कूल, कोरेगाव भीमा, ओंकार अविनाश निगडे - राजगड विद्यालय भोंगवली, अजित सुभाष गाडे - श्रीमती लक्ष्मीबाई विद्यालय दुराफे, विजय लक्ष्मण बुनगे, विकास दत्तात्रय शिंदे, कस्तुराबाई विद्यालय - इंदापूर, यश नानासाहेब जाधवराव - पब्लिक स्कूल वाघोली, दर्शन गणेश कांबळे - भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरुळी.
१७ वर्षे वयोगट :
सोनबा नामदेव पालवे - गुरुकुल विद्यालय सासवड, प्रवीण मल्हारी हरणावळ - राधिका विद्यालय इंदापूर, प्रसाद उत्तम जगदाळे - गुरुकुल विद्यालय सासवड, रोहन राजेंद्र थोपटे - राजगड ज्ञानपीठ भोर, अंबर कृष्णकांत सातव - न्यू इंग्लिश स्कूल, लोणीकंद, सूरज दत्तात्रय माने - श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव - केतकी, अतुल शंकर जाधव - न्यू इंग्लिश स्कूल वरवे, सौरभ बलभीम गायकवाड - श्री भैरवनाथ विद्यालय भिगवण, प्रतीक अरुण कदम - कस्तुराबाई विद्यालय इंदापूर.
१९ वर्षे वयोगट :
सुमित संजय टेळे - गोपीनाथ माध्यमिक विद्यालय वरवंड, सूरज राजेंद्र गोळ - पिरंगुट ज्युनियर कॉलेज पिरंगुट, संकेत दामू ठाकूर - इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे, पोपट गुलाबराव पालवे - वाघिरे महाविद्यालय, सासवड, प्रतीक उत्तम जगदाळे - वाघिरे कनिष्ठ महाविद्यालय सासवड, मयूर नंदू लिम्हण - न्यू इंग्लिश स्कूल विंझर, पवन बाळू सरगर - एन. ई. एस. हायस्कूल निमसाखर, सोमनाथ महादेव हरणावळ - श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी, शिरीष संजय गाफणे - छत्रपती हायस्कूल भवानीनगर, नीलेश काकासोा घाडगे - श्री वाधेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा.
१९ वर्षे वयोगट :
प्रशांत महादेव महांगरे - अनंतराव थोपटे विद्यालय भोर, चंदन नारायण मरगुजे - थोपटे हायस्कूल खानापूर, दत्तात्रय बाबा तिखे - वाघिरे महाविद्यालय सासवड, अक्षय नवनाथ कामथे - वाघिरे महाविद्यालय सासवड, आबा सिदा शेंडगे - शरदचंद्र पवार विद्यालय चिंचणी, रोहित दत्तात्रय जाधव - श्री नारायणदास हायस्कूल इंदापूर, अभिषेक बाळासाहेब देशमुख - नवभारत माध्य. विद्यालय शिवणे, अक्षय देविदास मारकड - कला, वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, मुन्ना महेबूब शेख - श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर, अभिषेक भानुदास गावडे - एशिएन कॉलेज, नऱ्हे.
ग्रीक-रोमन स्टाईल
१७ वर्षे वयोगट :
मयूर नारायण मोटे, कदम विद्यालय इंदापूर, संकेत खंडोबा शिंदे - थोपटे विद्यालय, खानापूर, अनिल संजय कारंडे - कदम विद्यालय, इंदापूर, पवनकुमार एकनाथ चौरे - पिरंगुट इंग्लिश स्कूल, युवराज अशोक ससे - सोमेश्वर विद्यालय, कुलदीप संतोष इंगळे - शरदचंद्र पवार विद्यालय चिंचणी, ऋतुराज तात्यासो सपकाळ - श्री छत्रपती इंग्लिश स्कूल भवानीनगर, प्रसाद संतोष धुमाळ - न्यू इंग्लिश स्कूल वरवे, दिग्विजय संदीप भोंडवे - न्यू इंग्लिश स्कूल तुळापूर, सूरज राजेंद्र जगदाळे - शरदचंद्र पवार विद्यालय चिंचणी.