मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना माती नमुना प्रशिक्षण.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:38+5:302020-12-07T04:07:38+5:30
प्रारंभी खेड तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी माती परीक्षण आणि जमीन आरोग्यपत्रिका याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडल ...
प्रारंभी खेड तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी माती परीक्षण आणि जमीन आरोग्यपत्रिका याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे, माजी सरपंच वामन लांडे, उपसरपंच सिताराम गुजर, अंकुश दौंडकर, सुभाष दौंडकर, मिलिंद मोहिते, सोपान दौंडकर, कुंडलिक लांडे, सत्यवान मोहिते, कृषिमित्र शांताराम लांडे, माणिक साबळे, कृषी सहाय्यक कल्पना घोडे, वैशाली खडतरे, मेघा कांबळे आदिंसह अन्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान कृषि पर्यवेक्षक गणेश ठाकुर यांनी माती व पाणी तपासणी तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीने होणारे फायदे व त्यासाठी मिळणारे अनुदान याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तर मंडल कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कृषि सहाय्यक मेघा कांबळे तर माजी सरपंच वामन लांडे यांनी आभार मानले.
फोटो
०६ शेलपिंपळगाव
शेतकऱ्यांना माती नमुना प्रशिक्षण देताना कृषी विभागाचे अधिकारी.