पिकांच्या उत्पादनवाढीसाठी माती परीक्षण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:54+5:302020-12-11T04:28:54+5:30
देवकरवाडी (ता.दौंड) येथे जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने मंडल कृषि अधिकारी राहु येथील कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात ...
देवकरवाडी (ता.दौंड) येथे जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने मंडल कृषि अधिकारी राहु येथील कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पर्यवेक्षक चव्हाण यांनी जागतिक मृद दिनानिमित्त पीक उत्पादनात मातीचे महत्त्व व त्यातील घटक व जमिनीचे आरोग्य, आरोग्य बिघडण्याची कारणे, जमीन सुपिकता निदेर्शांक,जमिनीचे भौतिक,जैविक व रासायनिक गुणधर्म याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी राजेश थोरात यांनी ऊस लागवडीसाठी मार्गदर्शन केले.
यावेळी दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक भास्कर देवकर, उपसरपंच सुनील धुमाळ, कृषि सहाय्यक अभिजित लोणकर,संतोष लोणकर,महिला बचत गटाच्या अध्यक्षा मीना काळे,संदीप देवकर,अनिल देवकर,भाऊ कुसेकर,विलास सोनवणे,विठ्ठल धुमाळ,दशरथ धुमाळ,अशोक भोसले आदी उपस्थित होते.