मराठा आंदोलनामुळे सोलापूर, नाशिक,एसटीच्या फेऱ्या रद्द : पुणे विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 03:56 PM2018-07-30T15:56:51+5:302018-07-30T17:01:40+5:30

नुकसान व प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही कारणांमुळे पुण्याहून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Solapur, Kolhapur, Nashik, STs canceled due to Maratha agitation : Pune division's decision | मराठा आंदोलनामुळे सोलापूर, नाशिक,एसटीच्या फेऱ्या रद्द : पुणे विभागाचा निर्णय

मराठा आंदोलनामुळे सोलापूर, नाशिक,एसटीच्या फेऱ्या रद्द : पुणे विभागाचा निर्णय

Next
ठळक मुद्देतणाव सदृश परिस्थिती नियंत्रणात आल्यावर या गाडया पुन्हा सुरु करण्यात येणार

पुणे :  राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या मराठा मोर्चाने घेतलेल्या हिंसक वळणात एसटीला लक्ष्य केले जात आहे. आंदोलनाच्या कालावधीत प्रत्येक ठिकाणी एसटी बस पेटवण्यात आली तसेच तिची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. होणारे नुकसान व प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही कारणांमुळे पुण्याहून सोलापूर, नाशिक आदी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती पुणे वि़भाग नियंत्रण कक्षाच्या यामिनी जोशी यांनी दिली आहे. विविध भागात निर्माण झालेली तणाव सदृश परिस्थिती नियंत्रणात आल्यावर या गाडया पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Solapur, Kolhapur, Nashik, STs canceled due to Maratha agitation : Pune division's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.