भीमाशंकरच्या अादिवासी कुटुंबीयांचे अायुष्य हाेणार प्रकाशमान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 08:26 PM2018-10-08T20:26:29+5:302018-10-08T20:27:58+5:30
सायन्स पार्कच्या साय-टेक सूर्या साैरदिवे प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक अादिवासी वाड्या व वस्त्यांवर जिथे विद्युत पुरवठा करणे शक्य नाही अशा कुटुंबांना साैरदिवे देण्याचा प्रकल्प रविवारी राबविण्यात अाला.
पुणे : भीमाशंकरमधील अभयारण्यामध्ये पिढ्यांन पिढ्या अंधारामध्ये अायुष्य जगणाऱ्या अादिवासी लाेकांचे अायुष्य प्रकाशमान करण्याचे काम पुण्यातील सायन्स अॅन्ड टेक्नाॅलाॅजी पार्ककडून करण्यात येत अाहे. सायन्स पार्कच्या साय-टेक सूर्या साैरदिवे प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक अादिवासी वाड्या व वस्त्यांवर जिथे विद्युत पुरवठा करणे शक्य नाही अशा कुटुंबांना साैरदिवे देण्याचा प्रकल्प रविवारी राबविण्यात अाला.
सायन्स अॅन्ड टेक्नाॅलाॅजी पार्क या संस्थेतर्फे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सी. एस. अार. उपक्रमाद्वारे भीमाशंकर अभायारण्यातील वीज जाेडणी पासून वंचित असणाऱ्या 500 कुटुंबांना साैर दिव्यांचे वाटप करण्यात अाले. भीमाशंकरमधील बहुतांश अभयारण्यामध्ये वन्यजीव संरक्षणाच्या गरजेमुळे विद्युत पुरवठा करणे शक्य हाेत नाही. अशा शेकडाे अादिवासी वस्त्या व कुटुंबे पिढ्यांन पिढ्या अंधारामध्ये अायुष्य जगत असतात. अशांना हे साैरदिवे देऊन त्यांच्या अायुष्यात अाशेचा किरण अाणण्याचे कार्य सायन्स पार्कच्या वतीने करण्यात अाले अाहे.
या सायटेक सूर्या साैर दिव्यांचे वैशिष्ट म्हणजे, या साैर दिव्यांसाठी प्रथमच नवीन तंत्रज्ञान वापरण्यात अाले अाहे. दिव्यांमध्ये लिथियम अायन बॅटरीचा वापर केल्यामुळे अाठ तासातच चार्जिंग पुर्ण हाेते. यात दहा तासाच्या बॅकअपची सुविधा अाहे. तसेच दाेन बल्ब एकत्रित वापरल्यास पाच ते सहा तास साैर दिवा चालू शकताे. दिव्यांचे अायुष्यमान सुमारे 7 वर्षापर्यंतचे अाहे. या दिव्यांना काेणत्याही देखभालीची अावश्यकता भासणार नाही.