कोंडी टाळण्यासाठी सोलर सिग्नल
By admin | Published: October 17, 2015 01:10 AM2015-10-17T01:10:41+5:302015-10-17T01:10:41+5:30
मुंंढवा-कोरेगाव पार्क, पिंगळेवस्ती या परिसरात दिवसेंदिवस वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंढव्याकडून कोरेगाव पार्कला जाणाऱ्या वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते
मुंढवा : मुंंढवा-कोरेगाव पार्क, पिंगळेवस्ती या परिसरात दिवसेंदिवस वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंढव्याकडून कोरेगाव पार्कला जाणाऱ्या वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. प्रभाग २० मधील ताडीगुत्ता चौकातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी या चौकात माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून सोलर सिग्नल बसविण्यात आले. याचे उद्घाटन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्या हस्ते झाले.
कोरेगाव पार्ककडून पिंगळेवस्ती घोरपडीकडे जाणाऱ्या वाहनांचे मार्ग बदलले आहेत. या वेळी नगरसेविका चंचला कोद्रे, कैलास कोद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जानमहंमद पठाण, संदीप कोद्रे, रवी धायरकर, अनिल धायरकर, सुरेंद्र गायकवाड, रमेश कोद्रे, रोहित लोणकर, नीलेश भंडारी, अतुल कोद्रे व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
ताडीगुत्ता चौकात सतत होणारे अपघात व वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हे सिग्नल बसविण्यात आले आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. यामुळे ताडीगुत्ता चौकातील कोंडी कमी होईल.
- चंचला कोद्रे, नगरसेविका व माजी महापौर