पुण्याच्या महिला कारागृहात सुर्याला लावले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:09 AM2018-05-31T10:09:49+5:302018-05-31T10:09:49+5:30
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती महिला कारागृहात साेलार स्टिम कुकर सिस्टीम बसविण्यात अाली असून, या माध्यमातून माेठ्याप्रमाणावर इंधन बचत हाेत अाहे.
राहुल गायकवाड
पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती महिला कारागृहातील जेवण सध्या साैरउर्जेचा वापर करुन तयार केले जात अाहे. या कारागृहामध्ये साेलार स्टीम कुकर सिस्टीम बसविण्यात अाली असून ही सिस्टीम बसविणारे येरवडा कारागृह हे भारतातील पहिले कारागृह ठरले अाहे. या सिस्टिममुळे महिला कारागृहातील जेवण तयार करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा वापर कमी झाला असून तुरुंगाचा माेठ्याप्रमाणावर खर्च वाचला अाहे.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नॅशनल साेलार मिशन या याेजनेंतर्गत कारागृहाला 22 लाख 37 हजार 500 रुपये देण्यात अाले हाेते. त्यातून ही सिस्टीम कारागृहात बसविण्यात अाली अाहे. कारागृहाचे अधिक्षक बी.टी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त वरिष्ठ तरुंग अधिकारी ज्ञानेश्वर खरात यांनी स्वतः याचे प्रशिक्षण घेऊन ही सिस्टीम महिला कारागृहात बसविण्यात पुढाकार घेतला. या सिस्टीममुळे अाधी महिला कारागृहात जेवण तयार करण्यासाठी अाठवड्याला 7 गॅस सिलेंडर लागत असे त्याचे प्रमाण अाता एका सिलेंडरवर अाले अाहे. त्यामुळे माेठ्याप्रमाणावर कारागृहाच्या खर्चात कपात झाली अाहे. महिला कारागृहाच्या मागील बाजूस 12 साेलर पॅनल बसविण्यात अाले अाहेत. तसेच महिला तुरुंगाच्या स्वयंपाक गृहात तीन माेठाले कुकर बसविण्यात अाले अाहेत. त्यातील एक कुकर हा दूध व पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येताे तर इतर दाेन कुकर हे भाज्या व डाळ शिजवण्यासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे केवळ भाजीला फाेडणी देण्यासाठी व चपात्या भाजण्यासाठी गॅसचा वापर करण्यात येत अाहे. या सिस्टिममुळे सुमारे 17 हजार 500 रुपये महिन्याला वाचविले जात अाहेत.
विशेष म्हणजे हे सर्व अन्न वाफेवर तयार केले जाते. त्यासाठी तेलाचा वापर केला जाताे. साैरउर्जेचा वापर करुन तेल गरम केले जाते, त्या तेलाच्या वाफेतून अन्न शिजवले जाते. त्याचबराेबर हे तेल फक्त गरम केले जात असल्याने ते पुन्हा पुन्हा वापरले जाते. त्यामुळे त्याचाही कुठलाच खर्च येत नाही.जवाहरलाल नेहरु साेलार मिशन याेजनेअंतर्गत मिळालेला निधी पुण्याच्या महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरणाला वर्ग करण्यात अाला हाेता. प्राधिकरणाकडून ही साेलार स्टीम कुकर सिस्टिम बसविण्याचे काम नागपूरच्या ग्रीन लाईफ कंपनीला देण्यात अाले हाेते. ही सिस्टीम बसवून 15 दिवस झाले असून त्याचा माेठा फायदा अाता कारागृहाला हाेताना दिसत अाहे.
याविषयी बाेलताना ज्ञानेश्वर खरात म्हणाले, गेल्या 15 दिवसांपूर्वी ही सिस्टीम कारागृहात कार्यान्वित करण्यात अाली. त्यानंतर कारागृहाच्या इंधनात माेठ्याप्रमाणावर बचत हाेत अाहे. त्याचबराेबर नैसर्गिक स्त्राेतांच्या वापराला चालना मिळत अाहे. कारागृहातील 279 महिलांचे जेवण अाता या साेलर सिस्टीमच्या माध्यमातून तयार केले जात अाहे.