सैनिकांना दररोज शहीद व्हावं लागणं दुर्दैवी - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:06 AM2018-04-16T03:06:12+5:302018-04-16T03:58:49+5:30

‘तुम्ही आमचा एक सैनिक मारला तर आम्ही तुमचे अकरा सैनिक मारू,’ असे इशारे पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात सीमेवर दररोज दोन-चार सैनिक शहीद होत असताना, केंद्रातील सरकार काहीच करताना दिसून येत नाही.

 Soldiers are unhappy to be martyred everyday - Sushilkumar Shind | सैनिकांना दररोज शहीद व्हावं लागणं दुर्दैवी - सुशीलकुमार शिंदे

सैनिकांना दररोज शहीद व्हावं लागणं दुर्दैवी - सुशीलकुमार शिंदे

googlenewsNext

पुणे - ‘तुम्ही आमचा एक सैनिक मारला तर आम्ही तुमचे अकरा सैनिक मारू,’ असे इशारे पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात सीमेवर दररोज दोन-चार सैनिक शहीद होत असताना, केंद्रातील सरकार काहीच करताना दिसून येत नाही. सैनिकांना अशा प्रकारे दररोज शहीद व्हावं लागण दुर्दैवी असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी केली.
महाराष्टÑ राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या सन्मान सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाराष्टÑ राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, शहराध्यक्ष किरण जोशी, कार्याध्यक्ष नितीन बिबवे उपस्थित होते. सीमेवर शत्रुंशी लढताना अपंगत्व आलेल्या मीरबहादूर गुरम, आप्पा राव व पांडुरंग यादव या वीर जवानांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन जैन, कुंकुम नरेन, नंदकुमार चोरडिया, मंगेश पारोटे, कालिदास मोरे, ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक निनाद देशमुख, पत्रकार ताजेश काळे, संदीप चव्हाण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रात काँगे्रसचे सरकार सत्तेवर असताना निर्भया प्रकरण घडले तेव्हा आम्ही न्यायमूर्ती वर्मा यांची समिती नेमून दोन महिन्यांत बलात्काराबाबतचे कायदे कडक केले. सध्या देशात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान सभागृहाचे नेते असूनही संसदेला सामोरे जात नाहीत. काँग्रेसने उपोषण केले म्हणून भाजपानेही उपोषण केले हे अत्यंत चुकीचे आहे.’’
पत्रकारांनी सैनिकांना अभिवादन करण्यारिता कार्यक्रम घेतला ही
अत्यंत चांगली बाब आहे.
जवानांच्या शौर्याचा गौरव झाल्यामुळे त्यापासून इतरांना सैन्यात जाण्यासाठी प्रेरणा मिळेल.
पत्रकार नेहमी दुसऱ्यांच्या घरात डोकावून त्यांच्या दु:खांचा शोध घेत असतो, त्यानंतर त्या दु:खांचे आॅपरेशन करून ती दूर करतो. वॉटरगेटपासून पत्रकारितेला शोध पत्रकारितेची मोठी परंपरा असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले.
संजय भोकरे व किरण जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संदीप चव्हाण यांनी या वेळी सैनिकांवरील कविता सादर केली.

सैनिकांच्या संस्थेला २१ हजारांची मदत
‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या सन्मान सोहळ््यामध्ये सीमेवर शत्रुंशी लढताना अपंगत्व आलेल्या मीरबहादूर गुरम, आप्पा राव व पांडुरंग यादव या वीर जवानांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्यासाठी काम करणाºया पॅराबिलॉजी रिहॅबिलिटेशन संस्थेला २१ हजार रुपयांची मदत या वेळी करण्यात आली.

Web Title:  Soldiers are unhappy to be martyred everyday - Sushilkumar Shind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.