जवानांना अभिमान वाटायला हवा - नांबियार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:47 PM2018-08-17T23:47:43+5:302018-08-18T00:13:35+5:30

देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले.

The soldiers should be proud - Nambiar | जवानांना अभिमान वाटायला हवा - नांबियार

जवानांना अभिमान वाटायला हवा - नांबियार

Next

दौंड : देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले.
दौंड रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लष्करी जीवन’ या विषयावर ते बोलत होते. देशाचे जवान सीमेवर शत्रू राष्ट्राशी लढत असताना ते देशातील समाज बांधवांचे रक्षण करीत असतात. तर आपत्तकालीन वेळेत नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. तेव्हा सैन्य दलातील अधिकारी आणि जवान यांचा आदर झाला पाहिजे. लष्करात सहभागी झाल्यानंतर प्रत्येक जवानाने आपले आयुष्य राष्ट्रासाठी अर्पित केलेले असते. तेव्हा शिस्त हा लष्कराचा प्रमुख भाग असून जे काही कार्य करायचे आहे ते शिस्तीनेच झाले पाहिजे अशी लष्कराची संहिता आहे.
रोटरीचे अध्यक्ष मनोहर बोडखे, सचिव प्रमोद खांगल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. फिलेमोन पवार यांनी नांबियार यांचा परिचय करुन दिला.

...ते गोळीबारात जखमी झाले होते

- कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार हे सियाचीन येथे १९८५ मध्ये शत्रू राष्ट्राने केलेल्या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र, परिस्थितीपुढे न डगमगता त्यांनी शत्रू राष्ट्राचा सामना केला होता. विविध पदकांचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय युद्ध अभ्यास पथकांचे नेतृत्व त्यांनी केले होते.
- बºयाचदा सैन्यात भरती होण्याकरिता जवानांची ओढ असते. मात्र समाज त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी अडथळे निर्माण करतो. सैन्यात मरायला जायचे का, अशीही खिळ घातली जाते. मात्र सैन्यात देशाची सेवा करणे याच्या सारखे दुसरे भाग्य नाही असे शेवटी सेवानिवृत्त कर्नल रघुनाथन नांबियार म्हणाले.

Web Title: The soldiers should be proud - Nambiar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.