घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी
By admin | Published: February 13, 2015 05:44 AM2015-02-13T05:44:48+5:302015-02-13T05:44:48+5:30
: पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. कचरा निर्मुलन व नागरिकांचे आरोग्य या महत्वाच्या बाबी आहेत.
पिंपरी : पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. कचरा निर्मुलन व नागरिकांचे आरोग्य या महत्वाच्या बाबी आहेत. कचऱ्यापासून इंधननिर्मिती असे प्रयोग करण्यापेक्षा घनकचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचेच प्रयत्न व्हावेत. ही माफक अपेक्षा आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. घनकचरा विल्हेवाट याबाबतचे सादरीकरण पालकमंत्री बापट यांच्या उपस्थितीत झाले. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे नागरिकांना ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी घरोघरी डबे दिले आहेत. डबे वाटपाचे काम सुरू आहे. परंतू त्यांनी डब्यात जमा केलेल्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणा पालिकेने विकसित करावी.