३२ हजार ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा

By admin | Published: November 16, 2015 01:51 AM2015-11-16T01:51:06+5:302015-11-16T01:51:06+5:30

अतिभारित झालेल्या पिंपरी उपकेंद्गाचा ५० टक्के वीजभार कमी करण्यासाठी रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्गातून नवीन २२ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी रविवारी कार्यान्वित करण्यात आली.

Solid power supply to 32 thousand customers | ३२ हजार ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा

३२ हजार ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा

Next

पिंपरी : अतिभारित झालेल्या पिंपरी उपकेंद्गाचा ५० टक्के वीजभार कमी करण्यासाठी रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्गातून नवीन २२ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी रविवारी कार्यान्वित करण्यात आली. या वीजवाहिनीमुळे पिंपरी व सांगवी परिसरातील सुमारे ३२ हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
पिंपरी येथील २२/२२ केव्ही उपकेंद्गातून पिंपरी व सांगवी परिसराला वीजपुरवठा केला जातो. पिंपरी उपकेंद्गातून निघणाऱ्या एचए-१ या २२ केव्ही वीजवाहिनीद्वारे १२मेगावॉट वीजपुरवठा केला जात होता. वाढती मागणी, नवीन वीजजोडण्या आदींमुळे पिंपरी उपकेंद्ग व एचए-१ ही ११ केव्ही वीजवाहिनी अतिभारित झाली होती. तीन वर्षांपूर्वी रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्गातून नवीन २२ केव्ही वीजवाहिनी प्रस्तावित करण्यात आली होती. रस्ते खोदाईच्या अडचणींमुळे नवीन वाहिनीच्या कामास विलंब होत गेला. सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या या नवीन वीजवाहिनीचे काम कार्यकारी अभियंता धनंजय औंढेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धवल सावंत यांनी पिंपरी महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने नुकतेच पूर्णत्वास नेले. काही ठिकाणी ओव्हरहेड तर काही ठिकाणी ही वाहिनी भूमिगत आहे. रहाटणी उपकेंद्गातून निघालेल्या या वाहिनीद्वारे ६ मेगावॉटचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आता पिंपरी उपकेंद्गाचा व या उपकेंद्गातून निघालेल्या २२ केव्ही एचए-१ वीजवाहिनीवरील ६ मेगावॉटचा वीजभार कमी झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Solid power supply to 32 thousand customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.