राजगुरुनगरची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हवे ठोस धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:16 AM2018-12-15T02:16:22+5:302018-12-15T02:16:38+5:30

नवीन पूल, रुंदीकरणही पडू लागले तोकडे; समस्या कायम

Solid strategies to solve traffic congestion of Rajgurunagar | राजगुरुनगरची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हवे ठोस धोरण

राजगुरुनगरची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हवे ठोस धोरण

Next

खेड : राजगुरुनगर शहरांतर्गत वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठोस वाहतूक धोरणाची गरज आहे. यावर विविध तोडगे काढूनही ते तोकडे पडत असल्याचे येथील चित्र आहे. नियोजनाअभावी अजूनही राजगुरुनगरचा श्वास वाहतुकीमुळे कोंडत आहे. हुतात्मा राजगुरू पूल वाहतुकीसाठी खुला झाला. पुणे-नाशिक महामार्गाचे जुजबी का होईना रुंदीकरण व मजबुतीकरण झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा वाहतूक नियमनासाठी असतो. काही प्रमाणात अतिक्रमणे हटवली. या साऱ्या प्रयत्नांनंतरही राजगुरुनगर आणि वाहतूककोंडी हे समीकरण कायम आहे. नगर परिषद आणि पोलिसांचेही वाहतुकीबाबत ठोस धोरण नसल्याने वाहतूककोंडीची समस्या राजगुरुनगरमध्ये कायम आहे.

अवजड वाहनांना ठराविक काळात प्रवेशबंदी, एकेरी वाहतूक, सम-विषम तारखांना पार्किंग, अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांचे पार्किंग, वाहतूक नियंत्रक दिवे अशा उपाययोजनांची गरज असताना त्या होताना दिसत नाहीत. जुजबी मलमपट्ट्या आणि ठोस वाहतूक धोरणाच्या अभावामुळे वाहतूक समस्या कमी होताना दिसत नाही.

राजगुरुनगरमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नाशिक रस्ता ते प्रांत कार्यालयादरम्यान ठराविक काळासाठी अवजड वाहने बंद करावीत. एसटी बस नवीन हुतात्मा राजगुरू पुलावरून वळवाव्यात, सम-विषम तारखांची पार्किंग अंमलबजावणी झाल्यास शहरांतर्गत वाहतूककोंडीला काही प्रमाणात आळा बसू शकतो.

काय होतेय?
राजगुरुनगर शहरांतर्गत वाहतूक समस्या

उपाय काय?
अवजड वाहनांना ठराविक काळात गावात प्रवेश
एसटी, कंपनी बस, मालवाहक वाहने हुतात्मा राजगुरू पुलाकडून वळवावीत
सम-विषम तारखांचे पार्किंग
नियमांची अंमलबजावणी
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक नियंत्रक दिवे
रस्त्यावरील वाहनांच्या
पार्किंगला शिस्त

अवजड व मोठ्या वाहनांची नवीन पुलावरून ये-जा करावी. अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावावी. स्वयंशिस्त प्रत्येकाने पाळावी. असे झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन सर्वांचा वेळ व इंधन वाचेल आणि गैरसोय टळेल.
- अरुण गायकवाड,
माजी सदस्य,
राजगुरुनगर ग्रामपंचायत

वारंवार होणाºया वाहतूककोंडीमुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प होत आहे. त्यामध्ये अनेक वेळा अ‍ॅम्ब्युलन्सही अडकलेल्या असतात. त्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

Web Title: Solid strategies to solve traffic congestion of Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.