बनेश्वर मंदिराजवळ होणार घनकचरा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:13 AM2021-09-11T04:13:14+5:302021-09-11T04:13:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटकांचे मिनी महाबळेश्वर असलेल्या श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराजवळच अवघ्या दोनशे मीटर अंतरावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटकांचे मिनी महाबळेश्वर असलेल्या श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराजवळच अवघ्या दोनशे मीटर अंतरावर पुणे महानगर विकास प्राधिकरणाने घनकचरा डेपो आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे प्रस्तावित आरक्षण टाकले आहे. यामुळे श्री बनेश्वर महादेव मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टने या दोन्ही संभावित प्रकल्पांना तीव्र विरोध केला असून, मंदिराजवळचे प्रकल्प आरक्षण रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
पुणे सातारा महामार्गालगत अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नसरापूर येथील श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि घनकचरा डेपोचे प्रस्तावित आरक्षण महानगर विकास प्राधिकरण संबंधित गावांवर लादत असल्यामुळे नसरापूरसह परिसरातील, जिल्ह्यासह, महाराष्ट्रातील अनेक भाविक, नागरिक संतप्त झाले आहे. या दोन्ही प्रस्तावित प्रकल्पास तीव्र आक्षेप घेत आहेत. तर श्रीक्षेत्र बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट यांनी तर आपला या संभावित प्रकल्पास तीव्र विरोध दाखवण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा हरकतीद्वारा बनेश्वर मंदिर विश्वस्तांनी दिलेला आहे.
या वेळी बनेश्वर महादेव संस्थान ट्रस्ट अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, उपाध्यक्ष हनुमंत कदम, सचिव अनिल गयावळ, माजी उपआयुक्त उपायुक्त रोहिदास कोंडे, विश्वस्त प्रकाश जंगम, आबासाहेब यादव, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत कदम, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा फडतरे उपस्थित होते.
चौकट
नुकताच पीएमआरडीएने जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे, त्यामध्ये श्रीक्षेत्र बनेश्वर नसरापूर येथील पुरातन असलेल्या शिवमंदिरलगत पर्यटन क्षेत्र प्रस्तावित केलेले आहे. मंदिरालगत असलेल्या केळवडे गावच्या हद्दीत घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया हे दोन प्रकल्प या प्रारूप आराखड्यात आरक्षित केले आहेत. मंदिरालगत उत्तरेकडून वाहणारी शिवगंगा नदी व ओढा यांचा नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत दक्षिणेकडे मंदिराभोवती येत आहे. या संभावित प्रकल्पांमुळे बनेश्वर मंदिरातील पाण्याचा स्त्रोत प्रदूषित होऊन मंदिरातील स्वच्छ पाणी दूषित होणार आहे. येथील पाण्याच्या टाक्यांमधील असणारी जीवसृष्टी या दूषित पाण्यामुळे धोक्यात येण्याचा संभव डावलता येणार नाही. या दूषित पाणी व दुर्गंधीमुळे बनेश्वर येथे येणारे भाविक व पर्यटक यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएने नकाशातील आरक्षणे चुकीच्या पद्धतीने टाकले आहे. नैसर्गिक पाणीप्रवाह, ग्रामपंचायतीच्या सध्याचा वहिवाटीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही असे माजी उपायुक्त रोहिदास कोंडे यांनी ठामपणे सांगत या चुकीच्या आरक्षणाचा फेरविचार व्हावा, असे सुचविले आहे.
--
फोटो ओळ : प्रस्तावित घनकचरा व सांडपाणी प्रकल्पांमुळे बनेश्वर मंदिराचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची माहिती देताना बनेश्वर देवस्थानचे पदाधिकारी.
100921\img_20210909_165628.jpg
सोबत फोटो व ओळ : प्रस्तावीत घनकचरा व सांडपाणी प्रकल्पांमुळे बनेश्र्वर् मंदिराचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची माहिती देताना बनेश्र्वर देवस्थानचे पदाधिकारी.