एकता इंग्लिश मीडियम स्कूलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:45+5:302021-08-24T04:13:45+5:30
बारामती: येथील एकता इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीसाठी दि मुस्लिम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. पी. ए. इनामदार यांनी १ ...
बारामती: येथील एकता इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीसाठी दि मुस्लिम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. पी. ए. इनामदार यांनी १ कोटींचा मदत निधी दिला आहे. त्यामुळे शाळेची आधुनिक इमारत होण्यासाठी हातभार लागणार आहे.
बारामती येथे अल्पावधीत विद्यार्थी संख्या वाढलेल्या शाळेत एकता इंग्लिश मीडियम स्कूलचा समावेश होतो. नावारुपाला आलेल्या एकता इंग्लिश मीडियम स्कूलच्या अत्याधुनिक होणाऱ्या बांधकामाला दि मुस्लिम को-आॅप बँकेचे चेअरमन डॉ. इनामदार यांनी १ कोटीचा निधी वैयक्तिकरीत्या मंजूर केलेला आहे. त्यापैकी २५ लाखांचा पहिला धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, उपाध्यक्ष सुबहान कुरेशी, सचिव परवेज सय्यद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलताना सांगितले की, सदर निधीचा पुरेपूर वापर करून बारामतीच्या वैभवात भर पडेल अशी वास्तू उभी करावी. पी. ए. इनामदार सारख्या दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतल्यामुळे शैक्षणिक मदत होत आहे. या वेळी तमाम बारामतीकरांच्या वतीने इनामदार यांचे आभार पवार यांनी मानले. तसेच शाळेच्या इमारतीसाठी भरघोस मदत केल्याबद्दल शाळा व्यवस्थापनातर्फे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते इनामदार यांचा सत्कार करण्यात आला.
एकता स्कूलसाठी डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिलेल्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारताना अल्ताफ सय्यद आणि अन्य.
२३०८२०२१ बारामती—०२